फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सध्या सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. अलीकडे लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी एक वेगळीच पद्धत काढली आहे. लोक व्हायरल होण्यासाठी लोकांसोबत विचित्र प्रॅंक करत आहे. अनेक जण भूताच्या वेषात येऊन लोकांना घाबरवत आहेत.
असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, ज्यामध्ये एक व्यक्ती एका लहान मुलीला घाबरवून पळीवून लावायला जातो. पण पुढे असे काही होते की तो स्वत:च पळून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण अशा व्हिडीमुळे जे लोक जास्त घाबरतात त्या लोकांना अनेकदा खूप त्रास होतो. तर काही वेळा प्रॅंक करणाऱ्यालाच ते महागात पडते.
हे देखील वाचा- सिंहांच्या टोळीने जिराफावर हल्ला केला अन्…,पाहा व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लहान मुलगी तिच्या आईसोबत टेकडीवरून जात आहे. अचानक तिच्या समोर एक बूत येते. जे तिला घाबरून पळवून लावायचा प्रयत्न करते. तितक्यात त्या मुलीची आई तेथे येते आई त्या भूतालाच पळवून लावते. तो भूत पळत असताना कळून येते की भूताच्या वेषात व्यक्ती आहे. ती आई त्याच्या मागे दगड घेऊन काठी घेऊन त्याला मारण्यास जाते. मात्र हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचे म्हणले जात आहे.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्याच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ muhabbat या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे वाटले की हा व्हिडिओ एका स्क्रिप्टेड आहे, ज्याचा उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आहे. YouTube किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे व्हिडीओ बनवले जातात. अनेकांनी या व्हिडीओचा आनंद घेतला आहे. अनेकजण यावर हसण्याचे इमोजी शेअर करत आहेत.