Viral Video A shocking video of Iran's Hormuz Island of blood-red flood video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा असे नैसर्गिक चमत्काराचे व्हिडिओ पाहायला मिळतात की, दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा येईल. सध्या असाच एक इराणच्या होर्मुझ बेटाचा एक धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. होर्मुझ बेटावरील लाल भडक ‘रक्ताचा’ पूर हा एक अत्यंत खास आणि अद्भुत निसर्गीय दृश्य आहे.
इराणच्या होर्मुझ बेटावर मुसळधार पाऊस झाल्यानंतर लाल रंगाच्या मातीचा पूर येतो आणि ते पाणी समुद्रात मिसळून त्याला लाल रंग देते. पर्शियन आखातात स्थित असलेल्या या बेटावर अनेक खनिजांचा समृद्ध भंडार आहे. यामध्ये जवळपास 70 विविध खनिजांचा समावेश आहे, यामुळे या बेटावर असलेल्या मातीला लाल रंग प्राप्त होतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बेटावर होणारा पूर इतका आकर्षक आणि विचित्र आहे की अंगावर काटा येईल. या बेटाच्या मातीचा थर खूप जाड असतो की, पाणी समुद्रात मिळताना समुद्र देखील लाल होतो. या रंगाच्या पाण्याचा देखावा काहीसा भयावह तरी अद्वितीय असतो. या बेटाची एक अन्य वैशिष्ट्य म्हणजे इथे कायम इंद्रधनुष्य तयार होतात, यामुळे ते ‘इंद्रधनुषी बेट’ म्हणून प्रसिद्ध आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
हे बेट आपल्या सौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. येथे येणारे पर्यटक त्याच्या अविस्मरणीय दृश्यांचा अनुभव घेतात, तसेच त्याच्या गरम पाण्याचा देखील आनंद घेतात. होर्मुझ बेटाच्या मातीचा स्थानिक लोक त्यांच्या जेवणात मसाले आणि मीठाऐवजी वापर करतात. होर्मुझ बेटाच्या मातीमध्ये लोह, सोडियम आणि 70 प्रकारची खनिजं आढळतात, ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात.
होर्मुझ बेटावरचे वातावरण आणि निसर्गाची विविधता इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वेगळे आणि आकर्षक अनुभव देते. याठिकाणी खनिजांचा समृद्ध स्रोत असण्यामुळे त्याचं महत्त्व अधिकच वाढते. या बेटावर स्थानिक लोकांनी तयार केलेली भाकरी आणि मातीचा उपयोग आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. यामुळे होर्मुझ बेटावरचा लाल रंगाचा पूर एक निसर्गाची अद्भुत सुंदरता आणि आश्चर्यकारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.