धक्कादायक! टॉयलेटमधील नळाच्या पाण्यात बनवला स्वयंपाक; नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सत्य घटनांवर आधारित चोरीचे, अपघातांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच सध्या अनेक किळसवाणे प्रकार देखील सोशल मीडियामुळे उघडकीस होत आहेत.सध्या एक धक्कादायक असा मेडिकल कॉलेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हा व्हिडिओ जबलपुर येथील एका मेडिकल कॉलेजचा असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे. या व्हिडिओत एका राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेदरम्यान स्वयंपाकासाठी टॉयलेटच्या नळातील पाण्याचा वापर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारीरोजी मध्यप्रदेशात जबलपुरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान मान्यवरांसाठी भोजनाची व्यवस्था विद्यापीठाने केली होती. मात्र, हे जेवण बनवण्यासाठी टॉयलेटमधील पाणी वापरले गेल्याचे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
जबलपुर के सरकारी मेडिकल कॉलेज में राष्ट्रीय स्तर का कॉन्फ्रेंस था, एक वीडियो वायरल हुआ जिससे ऐसा लग रहा है कि खाना शौचालय में लगे नल के पानी से बना, प्रशासन का कहना है इस पानी से सिर्फ बर्तन धुले, जांच के आदेश दिए गए हैं pic.twitter.com/gl3CP88v6r
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 11, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, टॉयलेटमधील नळाला पाईप जोडलेला असून तो पाईप पुढच्या स्वयंपाक सुरु असलेल्या ठिकाणापर्यंत जात आहे. या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे की, जेवण बनवण्यासाठी टॉयलेटच्या नळाच्या पाण्याचा वापर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या व्हिडिओचे स्पष्टीकरण देताना कॉलेजच्या डीन, नवनीत सक्सेना यांनी म्हटले की, ‘पाण्याचा वापर फक्त घाणरेडी भांडी स्वच्छ करण्यासाठी झाला आहे. स्वंपाकासाठी नाही. व्हिडिओ चुकीच्या अर्थाने काढला आहे. मात्र, अनेकांनी यावर तीव्र टिका केली आहे की, भांडी धुण्यासाठी वापरले काय आणि स्वयंपाकासाठी काय ते अस्वच्छ झाले ना असे म्हटले आहे. अनेकांनी कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.