Viral Video Astronut Koichi wakata playing baseball in space elon musk shared video goes viral
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अतंराळवीर बुच विल्मोर नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरुप परतले. 5 जून 2024 रोजी दोन्ही अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आठ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र, बोईंगच्या तांत्रिक बिघाडीमुळे त्यांच्या हा आठ दिवसांचा प्रवास 286 दिवसांत बदलला.
पण तुम्हाला माहित आहे का अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांना बराच काळ अंतराळत राहावे लागते. यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता असते. अतंराळात मनोरंजनाचे मार्ग त्यांना स्वत:चे शोधावे लागतात. अशा परिस्थिती मनोबल कमी असलेल्या व्यक्तींसाठी खूप मोठे आणि कठीण आव्हान असते.
यामुळे अंतराळात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. दरम्यान एलॉन मस्क यांनी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक अतंराळवीर स्पेसमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओत क्रिकेट खेळणारी व्यक्ती जपानी अंतराळवीर कोइचटी वाकाटा आहे. त्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा असा वापर केला आहे की, पाहून आश्चर्य वाटेल.
कोईची वाकाटा 2024 मध्ये जपानच्या एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी मधून निवृत्त झाले होते. त्यांनी जवळपास दोन दशक अंतराळ शटल कारकिर्दीत आपली सेवा दिली. त्यांनी पाच वेगवेगळ्या मोहीमांमध्ये 500 हून अधिक दिवस अंतराळात वेळ घालवला आहे. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहे. दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडुयावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
— Elon Musk (@elonmusk) March 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कोइची वाकाटा एक हातात ग्लव्ज घालून पूर्ण ताकदीने बॉल फेकतात. बॉल हवेत तरंगत दुसरीकडे जातो. बॉल फेकल्यानंतर अंतराळवीर बॅट घेऊन बॉलच्या मागे जातात आणि हलके चेंडूवर मारतात. त्यानंतर दुसऱ्या बाजूला येऊन कॅच पकडतात आणि आनंद साजरा करु लागातात. त्यांचा हा 22 सेकंदाचा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला लाखोहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी अंतराळात देखील एखादा क्रिकेटचा सामाना झाला पाहिजे असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हि़डिओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या @elonmusk एक्ल अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.