viral video blue drum viral video friends gift blue drum to groom and bride video goes viral
अलीकडे भारतात कोणी निळा ड्रम खरेदी करत असेल तर त्यांच्याकडे संशयित दृष्टीने पाहिले जात आहे. यामगचे कारण म्हणजे सध्या भारतात मेरठच्या सौरभ हत्याकांडानंतर पुरुषांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. सौरभच्या पत्नीने त्यांची हत्या करुन त्याला ड्रममध्ये सिमेंट टाकून गाडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक पुरुषांना पत्नीकडून अशी संपवण्याची धमकी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे निळ्या ड्रमची दहशत सध्या वाढत चालली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका लग्नसमारंभात मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला आहे.
सौरभच्या हत्याकांडामुळे निळ्या ड्रमची दहशतच लोकांच्या मनात घर करुन गेली आहे. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. यामुळे लोक काहीतरी हटके गिफ्ट देण्याचा विचार करतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला आहे. यामुळे लग्नातील कुटुंबीयांना आणि पाहुण्यांना धक्काच बसला आहे. यामुळे लग्नसमारंभात मोठी खळबळ उडाली आहे. या ड्रमला मित्रांनी लाल रिबिन लावून दिला आबे. मित्र ड्रम देत असताना नवरा-नवरी हसत आहेत. परंतु नवरी जास्त खळखळून हसताना दिसत आहे. तसेच खुळखुळ देखील दिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
तमाम लोग आहत हो रहे कि सोशल मीडिया पर नीले ड्रम का मजाक बन रहा और यहां शादी बारात तक मे नीले ड्रम गिफ्ट में दिये जाने शुरू हो गये हैं-
हमीरपुर में शादी समारोह के दौरान जयमाला स्टेज पर ब्लू ड्रम गिफ्ट में दिए जाने का मामला सामने आया है
इसका वीडियो भी सोशल मीडिया पर खूब वायरल है pic.twitter.com/UCeRZZWZUQ
— Andaz e Hunar अंदाज़-ए-हुनर (@betabdilshad) April 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @betabdilshad या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अलीकडे कुठे निळा ड्रम घेऊन जाताना दिसले तर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. निळा ड्रमच आता एक ट्रेंड बनत चालला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.