अभ्यास करता करता चिमुकला रडायला लागला; मग असे काही बोलला की...,व्हिडिओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून आश्चर्य वाटते की, खरेच असे होऊ शकते का? तर अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे खूप मनोरंजक असतात. असे व्हिडीओ पाहून हसूनहसून पोटात दुखायला लागते. लहान मुलांचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मुलांचे इतके गोंडस व्हिडीओ असतात की, आपण ते पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक 6-7 वर्षाच्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चिमुकला अभ्यास करत असताना अचानक रडू लागला. आणि असे काहीतरी बोलला की इंटरनेटवर सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बऱ्याचदा लहान मुले आपले ऐकत नाहीत. त्यांना अभ्यास करायचा नसतो. अशा वेळी ते असे काही तरी बोलून जातात की, हसू आवरता येत नाही. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
आयुष्यभर अभ्यास करून मी म्हतारा होईल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा त्याच्या आईसमोर अभ्यासासाठी बसलेला आहे. त्याची आई त्याला बाराखडी शिकवत असते. त्याला अभ्यास करायचा नसतो. मग तो अचानक अभ्यास करताना रडायला लागतो. रडत रडत म्हणतो की, ‘मी आयुष्यभर अभ्यास करून म्हातारा होईन. वेडी आई. यानंतर मुलाची आई म्हणते, ‘तु म्हातारे का होणार, म्हणजे क, ख ग लिहून म्हातारे होणार.’ यानंतर मुल पुन्हा त्याचे शब्द पुन्हा सांगतो आणि म्हणतो, ‘मी म्हातारा होईन आयुष्यभर अभ्यास करून.’ मुलाच्या या शब्दांमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – महिलेने एकाचवेळी पाच चपात्या बनवायची सांगितली ‘निन्जा टेक्निक’; पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडीओ
जिंदगी भर पढ़ाई करते-करते बुड्ढा हो जाऊंगा 😅 pic.twitter.com/JwC4PRgJq3
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) September 18, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत 23 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, बाळा, तू बरोबर आहेस. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, – ‘आयुष्यभर अभ्यास करावा लागतो?, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘म्हातारे अशिक्षित होण्यापेक्षा शिक्षित होऊन म्हातारे होणे चांगले.’ तसेच एका युजरने म्हटले आहे की, किती दुख: आहे बिचाऱ्याला. व्हिडीओवर अनेकांनी हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.