बाप रे! बस चालवताना अचानक ड्रायव्हर बेशुद्ध झाला अन्...; घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी डान्स रिल्स, तर कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी भांडणांचे व्हिडिओ आपल्या पाहायला मिळतात. याशिवाय तुम्ही अनेक सत्य घटनांवर आधारित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी बसला आग लागल्याचा व्हिडिओ तर कधी अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ एका बसचा आहे. यामध्ये अचानक बस ड्राव्हर बेशुद्ध झाला आणि तो खाली पडला. ही घटना बसमधील कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. हा व्हिडिओ बंगळूरला जाणाऱ्या एका बसचा असल्याचा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कंडक्टरचे कौतुक केले आहे.
बस कंडक्टरमुळे वाचले प्रवाशांचे प्राण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक बस चालक बस चालवताना दिसत आहे. बस चालवताना तो अचानक स्टेरिंगवर वाकतो. आणि अचानक बेशुद्ध होऊन बाजूला पडतो. यामुळे बस वाकडी तिकडी पळायला लागते. पण तितक्यात कंडक्टर येतो आणि बस थांबवण्याचा प्रयत्न करतो. कंडक्टरने ब्रेक दाबतो आणि बस थांबवतो. त्याच्या प्रयत्नामुळे बस थांबते आणि प्रवाशांचे प्राण वाचतात. ही घटना बंगळूरला जाणाऱ्या बसमदध्ये घडली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच असेही सांगण्यात आले आहे की, बस ड्राव्हरला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा- किती गोंडस! चिमुकल्यांचे बोबड्या बोलीत जोरदार भांडण; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
ఆర్టీసీ బస్సు డ్రైవర్కు గుండెపోటు.. డ్రైవింగ్ సీటు పైకి దూకి అందరి ప్రాణాలు కాపాడిన కండక్టర్
బెంగుళూరులో నేలమంగళ నుండి దసనాపుర వెళ్తున్న ఆర్టీసీ బస్సులో గుండెపోటుతో డ్రైవింగ్ సీట్ మీదే ప్రాణాలు విడిచిన బస్సు డ్రైవర్ కిరణ్ కుమార్.
డ్రైవర్కు గుండెపోటు రావడంతో డ్రైవింగ్ సీటు… pic.twitter.com/R53YNgpkrm
— Telugu Scribe (@TeluguScribe) November 6, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @TeluguScribe या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. तर अनेकांनी कंडक्टरच्या सावधगिरीचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, त्या कंडक्टरमुळे प्रवाशांचे प्राण वाचले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काका तुम्ही चांगले काम केले.