कौन हैं ये लोग? कहाॅं से आते हैं ये? चक्क उंटाला करवली बाईक स्वारी; VIDEO पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र विचित्र व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. डान्स रिल्स, तसेच भांडणांचे व्हिडिओ, स्टंट आणि जुगाड असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे भन्नाट कल्पनापण केली नसे अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे अनेकदा सोशल मीडिया रंगदार बनलेले असते. सध्या असाच एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तुम्ही गाडीवर अनेक गोष्टी नेण्याचे प्रयोग पाहिले असतील. कधी पाच-सहाजण एकाच बाईकवर तर कधी मोठे मोठे सामान गाडीवर लोकांना घेऊन जाताना तुम्ही पाहिले असेल. पण, दोन व्यक्ती चक्क उंटाला मोटरसायकलवर घेऊन जात आहेत. हा अनोखा प्रकार पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. यापूर्वी देखील उंटाला कारमधे बसवून नेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती चक्क एका उंटाला मोटरसायकलवर बसवून घेऊन जात आहेत. उंटाचे मागचे आणि पुढचेपाय बांधलेले आहेत. त्याला मधे बसवून एकाने त्याला मागच्या बाजूने त्याच्या शेपटीला पकडले आहे. त्या उंटाला असे बसताना त्रास होत असले. पण हे दोन्ही तरुण बिनधास्तच बसलेले आहे. बाईक चालवणारा देखील भरधाव वेगात बाईक चालवत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहे. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
मैंने कॉमेडी में सुना था,,, 🐫
कि ऊंट को इंडिगो में बैठना बहुत मुश्किल है परंतु इस बंदे ने तो गाड़ी पर बिठा दिया..!
हे प्रभु क्या-क्या देखना पड़ रहा है पर मैं तो अंधा हूं अच्छा हुआ…😂
#Camel #VanvaasTrailerOutNow pic.twitter.com/o3GEDcmL0y— रमेश मीना (@MeenaRamesh91) December 2, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MeenaRamesh91 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्या नंतर एका युजरने म्हटले आहे की, ‘हे कोण आहेत? आणि अशा भन्नाट कल्पना त्यांना सुचतात कशा?’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘हे फक्त भारतातच होऊ शकते’ तिसऱ्या एका युजरने ‘शोधू नका, हे लोक पृथ्वीवरच राहतात!’, आणखी एकाने म्हटले आहे की, ‘हे पाहून उंटालाही हसू आवरणार नाही’. तर काहींनी प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.