
फोटो सौजन्य सोशल मिडिया
या घटनेचा व्हिडिओ एका स्थानिक रहिवाशाने सोशल मिडियावर व्हायरल केला. इतके जड ओझे डोक्यावर घेऊन त्या मजुराला 21 व्या मजल्यांपर्यंत का जावे लागले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
व्हिडिओमध्ये तो मजूर विटा घेऊन पायऱ्या चढताना दिसत आहे. संबंधित रहिवाशाच्या म्हणण्यानुसार, त्या मजुराला विटा नेण्यासाठी चारपैकी कोणतीही लिफ्ट वापरण्याची परवानगी नव्हती. या घटनेवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या घटनेवर टीका केली असून, काम पूर्ण करण्यासाठी एका मजुराला इतका शारीरिक त्रास का सहन करावा लागला, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
यह सवाल अमीरी और गरीबी का नहीं, बल्कि इंसान के सम्मान और मेहनत की कद्र का है। 21 मंजिला इमारत में चार आधुनिक लिफ्ट हैं, लेकिन उसे बनाने वाले मजदूर को 20 किलो का बोझ सिर पर उठाकर सीढ़ियां चढ़नी पड़ती हैं।🤬 विडंबना देखिए, इमारत बनाने वालों के लिए ही कोई सुविधा नहीं!💔 जिस विकास में श्रमिकों की गरिमा और इंसानियत की जगह न हो, उस विकास पर सवाल उठना लाजिमी है। देश का निर्माण करने वाले मजदूरों का सम्मान भी उतना ही जरूरी है, जितना उस निर्माण का। @grok क्या यह सही हैं ?? — SB SHIVA (@SBYADAV25) October 31, 2026
व्हिडिओ रेकॉर्ड करताना स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मारतीत चार लिफ्ट उपलब्ध आहेत. मग त्या मजुराला लिफ्ट वापरू न देता, विटा घेऊन पायऱ्या चढायला का लावले गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रहिवाशाने म्हटले, “या इमारतीत 4 लिफ्ट आहेत. पण त्याला विटा लिफ्टमधून नेण्याची परवानगी नाही, म्हणून तो डोक्यावर विटा घेऊन 21 मजले चढत आहे. इथे अशी परिस्थिती आहे. अशा गोष्टींतूनच आपला देश नक्कीच ‘प्रगती’ करेल!” असा सवाल सोशल मिडिया द्वारे व्यक्त केला जात आहे.
विटा डोक्यावर घेऊन अनेक मजले चढल्यामुळे बांधकामाचा वेगही मंदावू शकतो. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली, “किती निरर्थक आणि उत्पादकतेचा अपव्यय! पायऱ्यांवरून विटा वर नेण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, ज्यामुळे बांधकामातही विलंब होईल. हे पूर्णपणे हास्यास्पद आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.