Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये लोकांच्या सेवेसाठी आणलेले शिवसेनेचे कंटेनर आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका कंटेनरमध्ये डेकोरेशनचे साहित्य, तर दुसऱ्यात अश्लील प्रकार सुरू असल्याचा खळबळजनक दावा भाजप नगरसेवकाने केला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खाडकन खळबळ उडाली असून व्हिडिओही व्हायरल होत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 04:58 PM
Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!

Follow Us
Follow Us:
  • भाईंदरमधील शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर
  • एका कंटेनरमध्ये डेकोरेशन आणि दुसऱ्यात अश्लील चाळे सुरू
  • कंटेनर हटवून संबंधितांवर कारवाईची मागणी 
Bhayander Viral Video News: भाईंदर पूर्व येथील सोनल पार्क परिसरात एका खासगी जागेवर ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या कंटेनरवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. लोकांच्या सामाजिक कार्यासाठी आणलेल्या या कंटेनरचा वापर भलत्याच कामांसाठी होत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नगरसेवक तरुण शर्मा यांनी केला आहे. एका कंटेनरमध्ये डेकोरेशनचे साहित्य भरल्याचे समोर आले आहे, तर दुसऱ्या कंटेनरमधील काही तरुणांचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

मूळात शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी हे कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून कारवाई टाळण्यासाठी हे कंटेनर आधीच्या ठिकाणावरून हटवून सोनल पार्क येथील एका खासगी जागेवर आणून ठेवण्यात आले. परंतु, आता या कंटेनरचा वापर सामाजिक कामासाठी नसून पूर्णपणे खासगी आणि संशयास्पद कारणांसाठी होत असल्याचा आरोप केला जात आहे.

भाजप नगरसेवक तरुण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांचे डेकोरेशन साहित्य ठेवण्यात आले असून, यासाठी जागामालकाला अडीच ते तीन हजार रुपये भाडे दिले जात असल्याची चर्चा आहे. तर त्याहूनही गंभीर म्हणजे, दुसऱ्या कंटेनरमध्ये तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे. “लोकांच्या सेवेसाठी आणलेल्या कंटेनरचा असा गैरवापर होत असेल, तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे,” असा संतप्त सवाल शर्मा यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Mumbra Drug Seizure: आकाशात नाही, थेट मुंब्र्यातील फ्लॅटमध्ये काळाबाजार! परदेशी नागरिक जाळ्यात; दीड कोटींचे ड्रग्स जप्त!

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे छायाचित्र

विशेष म्हणजे, ज्या कंटेनरवरून हा वाद निर्माण झाला आहे, त्या कंटेनरवर शिवसेनेचे अधिकृत बॅनर लावण्यात आले असून त्यावर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचे छायाचित्र देखील झळकत आहे. थोर नेत्यांच्या प्रतिमेचा वापर असलेल्या अशा साहित्याचा गैरवापर होत असल्याने शिवप्रेमींमध्येही संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Alephata Crime News: आळेफाटा परिसरात खळबळ! २६ वर्षांच्या तरुणाकडे सापडला गावठी कट्टा अन् जिवंत काडतुसे!

या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि हे वादग्रस्त कंटेनर सोनल पार्क परिसरातून तात्काळ हटवावेत, अशी लिखित मागणी नगरसेवक तरुण शर्मा यांनी नवघर पोलीस ठाण्याकडे केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर अद्याप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार आणि विरोधकांच्या आरोपांना कसे प्रत्युत्तर देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा वाद नेमका कुठे आणि कोणत्या विषयावरून सुरू आहे?

    Ans: भाईंदर पूर्व येथील सोनल पार्क परिसरात शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर होत असल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

  • Que: भाजप नगरसेवकाने काय आरोप केला आहे?

    Ans: एका कंटेनरमध्ये डेकोरेशनचे साहित्य ठेवले असून दुसऱ्या कंटेनरमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याचा आरोप भाजप नगरसेवक तरुण शर्मा यांनी केला आहे.

  • Que: या प्रकरणी कोणती कारवाई मागितली आहे?

    Ans: या प्रकरणाची चौकशी करून कंटेनर सोनल पार्क परिसरातून हटवावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नवघर पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Web Title: Bhayander bjp misuse of shiv sena containers viral video sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • BJP Candidate
  • Crime . Crime News
  • Mira Bhayander
  • viral video

संबंधित बातम्या

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
1

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Mira Bhayander  School Shoes Scam : 160 रुपयांचा बूट 500 रुपयांना; महापालिका शाळांतील सहित्यांत गैरव्यवहार, खळबळजनक माहिती समोर
2

Mira Bhayander School Shoes Scam : 160 रुपयांचा बूट 500 रुपयांना; महापालिका शाळांतील सहित्यांत गैरव्यवहार, खळबळजनक माहिती समोर

पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला
3

पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला

Viral Video : अरे देवा! सरकारी अधिकाऱ्याने चक्क मगरीच मासं खाल्लं, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे खळबळ!
4

Viral Video : अरे देवा! सरकारी अधिकाऱ्याने चक्क मगरीच मासं खाल्लं, सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.