Viral Video Couples Photoshoot goes wrong as colour bomb explodes video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. शिवाय लग्नाशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अलीकडे लग्नाचे फोटोशूट करणे अगदी ट्रेंड बनत चालला आहे. लग्न हा मुला-मुलीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. अलीकडे प्रत्येकजण हे क्षण कॅमेरात कैद करुन ठेवतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या थीममध्ये लोक फोटोशूट करतात. दरम्यान सध्या असाच एक फोटोशूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही क्षणांत आंनदाचे वातावरण दुख:त बदलले आहे. फोटोशूट दरम्यान वापरलेल्या रंगीबिरंगी धुराच्या बॉम्बचा स्फोट झाला आणि यामुळे नवरीला गंभीर दुख:पत झाली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लग्नाचा परिसर दिसून येत आहे. छान असे गुलाबी पांढऱ्या रंगाचे डेकोरेशन केले आहे. नवरा-नवरी तयार होऊन फोटोशूट करत आहेत. वराने वधूला उचलून घेतले आहे. या फोटोशूटदरम्यान वेळी मागच्या बाजूने रंगांचा बॉम्ब फोडला जातो, पण अचानक तो बॉम्ब जाऊन वधूच्या पाठीला लागतो. यामुळे वधूला भाजते. हा प्रकार बंगळूरमध्ये घडलेला आहे. एक नवविवाहित जोडपे फोटोशूट करत असताना गंभीर अपघात घडला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकदा लग्नात काम कितीही चोख असले तरी काही ना काही अनअपेक्षित घटना घडताता. या नवविवाहित जोडप्यासाठी देखील आनंदाच्या क्षणाचे दुखात रुपांतर झाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @viaparadise या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, अलीकडे अशा घटना खूप घडत आहेत, तर दुसऱ्या एका युजरने म्हणून पारंपारिक पद्धतीने लग्न केलेले योग्य असते असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने अशा गोष्टी वापरताना अत्यंत सावधपणा बाळगला पाहिजे, नाहीतर क्षणात सगळं उद्धवस्त होऊ शकते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.