(फोटो सौजन्य:X)
क्रिकेटच्या जगात पुल शॉट हा खेळातील सर्वात प्रतिष्ठित स्ट्रोक मानला जातो. रोहित शर्मा आपल्या या शॉटसाठी खास करून ओळखला जातो. यात रोहित शर्माचा हात कुणीही पकडू शकत नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. सध्या सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ देशातला नसून भारताचा शेजारील देश पाकिस्तानातून शेअर करण्यात आला आहे. यात एक सहा वर्षांची चिमुकली चक्क पुल शॉट मारत क्रिकेट खेळताना दिसून आली. तिचे हे कौशल्य पाहून सर्वच थक्क झाले. व्हिडिओ व्हायरल होताच आता तिची तुलना भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत केली जात आहे.
चिमुकलीचे नाव सोनिया खान असे आहे, ती पाकिस्तानची रहिवासी आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला एक चिमुकली गोलंदाजी करताना दिसली. चिमुकली अचूक वेळी शॉट मारते आणि पुल शॉटची कमाल दाखवते. तिचा हा शॉट पाहून सर्वच थक्क होतात. लहान वयातील तिच्या या कौश्यल्याचे आता सोशल मीडियावर फार कौतुक करण्यात येत आहे. या व्हिडिओला क्रिकेटप्रेमींनी अनेक लाईक्स, व्ह्यूज आणि कमेंट्स दिल्या आहेत. पाकिस्तानी मुलगी रोहित शर्माप्रमाणे पुल शॉट खेळते असे लोक म्हणत आहेत.
धक्कादायक! महिलेने 3 वर्षांच्या मुलीला रेल्वे रुळावर ढकलले, काळजात धस्स करून जाईल हा Viral Video
@RichKettle07 नावाच्या युजरने X अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘6 वर्षांची – पाकिस्तानची प्रतिभावान सोनिया खान (रोहित शर्मासारखी पुल शॉट खेळते)’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये चिमुकलीच्या या शॉटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाबरला आता तिच्यासोबत बदला!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरं टॅलेंट आहे”.
6 yrs old Talented Sonia Khan from Pakistan 🇵🇰 (Plays Pull Shot like Rohit Sharma) 👏🏻 pic.twitter.com/Eu7WSOZh19
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 19, 2025
दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. सध्या पाकिस्तानी संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाच सामन्यांच्या T20 सिरीजमध्ये ते 2-0 ने पिछाडीवर आहेत. या दौऱ्यासाठी आपल्या संघात बदल करताना पीसीबीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे दोन्ही खेळाडू आगामी तीन एकदिवसीय सिरीजदरम्यान संघात परततील.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.