viral video crocodile caught a young man tried to drag in water video goes viral
अलीकडच्या काही काळात सोशल मीडियावर अनेक धक्कादायका व्हिडिओ पाहायला मिळतात. असे व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा येतो. जंगली प्राणी, जलचर प्राणी यांच्यासंबधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असे प्राणी कदी कुठून कोमावर हल्ला करतील सांगणे कठीण असते. मानवाला कोणतीही चाहूल न लागू देता हे प्राणी त्यांची शिकार करतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ मेक्सिकोमधील असल्याचे म्हटले आहे.
एक जलतरणपटू पाण्यात पोहत असताना अचानक त्याच्यावर मगरीने हल्ला केला होता. या विचित्र आणि भयानक दृश्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माणूस नदीत पोहत असून आजूबाजूला जंगलाचा परिसर दिसत आहे. याच ठिकाणी दोन गाड्या देखील दिसत आहेत. यावरुन ल७ात येते की, कदाचित हे एखादे पर्यटन स्थळ असावे.
जेव्हा तरुण पोहण्याचा आनंद घेत असतो याच वेळी एक मगर त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला दिसते. तो मगरीला पाहताच भराभरा पोहत काठाच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याआधीच मगर त्याचा पाय धरते. मगर त्या माणसाचा पाय घट्ट धरुन त्याला पाण्यात आणखी ओढण्याचा प्रयत्न करते. आपला जीव वाचवण्यासाठी तरुण देखील अतोनात प्रयत्न करतो. आणि काही वेळानंतर आश्चर्यकारकपणे माणूस कसा तरी या भयानक घटनेतून वाचण्यात यशस्वी होतो. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की, अंगावर काटा येईल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Crazy footage shows the moment a drunk Mexican swimmer is chased down by a territorial crocodile. The croc clamped onto the man’s leg and attempted to pull him further into the water, yet incredibly, the drunken man somehow managed to survive the terrifying incident. pic.twitter.com/DgjJXjZdlo
— Morbid Knowledge (@Morbidful) July 29, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Morbidful या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देकील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, त्याचे नशीब चांगले होते की, त्याचा जीव वाचला तर दुसऱ्या एकाने त्याच्या मुर्खपणावर हसले आहे. अनेकांनी अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहिले पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.