तरुणी धावत्या ट्रेनला लटकून बनवत होती रिल इतक्यात आईनं पाहिलं अन्...; पहा पुढे काय घडलं, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळातात. स्टंट, जुगाड, डान्स असे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ पाहायला मिळत आहे. एक तरुणी ट्रेनला लटकत रिल बनवत असून यामुळे आपला जीव जाऊ शकतो याचे गांभीर्य तिच्या लक्षात येत नाही.पण पुढे तिच्याोबत असे काही घडलं आहे की, पुन्हा ती असे धोकादायक स्टंट करण्याचा विचार देखील करणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ट्रेनच्या दरवाज्यात उभी आहे. ट्रेन वेगाने धावत असून याचवेळी तरुणी कोणच्या तरू हात पकडून ट्रेनला उलटे लटकण्याचा प्रयत्न करते, तसेच एक व्यक्ती तिची रिल बनवत असतात. यामुळे तिचा जीव जाऊ शकतो याचे तिला गांभीर्य नसते, पण याच वेळी तिची आई तिथे येते आणि हे सगळे दृश्य पाहते. त्यानंतर आई तिला आत घेऊन जाते आणि चांगलाच चोप देते. ओरडा पडल्यावर तरुणी आईला विनवणी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचवेळी एक माणूस याच दोघींमध्ये मधस्थी करुन तरुणील मार मिळण्यापासून वाचवत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
बेटी बना रही थी ट्रेन में लटक कर रील, फिर क्या मम्मी अच्छे पिटाई कर दी pic.twitter.com/t9I3OlaZuR
— ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) February 22, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अलीकडे सोशल मीडियावर फेस होण्यासाठी अशा स्टंटबाजींचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: हे प्रमाण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोकांना यामुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो याचे गांभीर्य अजीवात राहिलेले नाही. आतापर्यंत अशा स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे लाखो लोकांचे जीव गेले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता असून याला लाईक्स आणि व्ह्यूज भरपूर मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने बिचाऱ्या ताई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आईने बरोबर केले, असा मार दिल्याशिवाय पोरांना समजत नाहीच असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही, पण हा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.