बाबांची लाडुबाई वैतागली! नुसता पसारा करतात म्हणत काढली खरडपट्टी; चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पिहल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. तुम्ही डान्स, जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. तसेच तुम्ही लहान मुलांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. अनेकदा ही लहान मुले असे काहीतरी करतात पाहून हसू आवरत नाही.
सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुकली आणि तिच्या वडिलांना रागवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वडील-मुलीचे नाते हे अगदी निरागस, प्रेमळ आणि आपुलकीने भरलेले असते. हे या व्हिडिओतून अत्यंत गोड पद्धतीने दिसत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली आपल्या वडिलांना त्यांची वस्तू निट न ठेवल्याबद्दल गोड स्वरात ओरडताना दिसत आहे. त्यावर वडील सुद्धा तिच्या बोलण्यावर हसून तिला गोड उत्तर देत आहेत.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या वडिलांना म्हणते, तुमचे काही धडच नाही. लॅपटॉप इथे तिथे पाडता तुम्ही. त्यावर वडील हसत सांगतात की, लॅपटॉप लागतो काम करायला. पण ती त्याचे उत्तर मानत नाही थेट आईला सांगते की बाबांनी सर्व वस्तू अस्ताव्यस्त ठेवल्या आहेत. आईही हसत-हसत तिला प्रश्न विचारते, हो का काय केले बाबांनी. यावर चिमुकली गंभीरपणे उत्तर देते, “बॅगमध्ये काहीच ठेवत नाही. मीच सगळे आवरते. त्यानंतर ती पुन्हा बाबांकडे जाऊन म्हणते, 1 नंबर फुसके बाबा आहेत, सगळे ड्रॉवरमध्ये का नाही ठेवले.यावर वडील तिच्या हसऱ्या तक्रारींना गोड उत्तर देतात, पण चिमुकलीचा हट्ट कायम असतो की बाबांनी वस्तू नीट ठेवाव्यात. शेवटी ती निरागसपणे म्हणते, किती काम करू बाबा टाबा चाबा, यावर वडील हसत विचारतात, ‘माझे काम तुला करायला काय होते? आणि ती तक्रार करते, हे काय बोलतात, फुसके बाबा आहेत.
हे देखील वाचा- किती गोंडस! चिमुकल्यांचे बोबड्या बोलीत जोरदार भांडण; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर dreamgirl_shraavi या शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहे. एका युजरने तिचे “फुसके बाबा” म्हणताना गोड बोलण्याचे कौतुक केले आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाबांची लाडू बाई वैतागली आहे, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘तिच्यामुळे घरात आनंदी वातावरण असणार कारण ती इतके गोड बोलते.’ या व्हिडीओमुळे वडील-मुलीच्या नात्याचा निरागस आणि हसरे दृश्य पाहायला मिळते.