
Daughter in Law Playing Guitar at her Muh Dikhai
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नववधू तिच्या मूह दिखाई कार्यक्रमात गिटार वाजवताना दिसत आहे. आसपास काही महिला तिच्याकडे आवाक् नजरेने बघत आहे. या नववधूने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून डोक्यावर पदर घेतला आहे, हातात लाल चुडा आहे आणि गिटार वाजवत आहे. ज्याची कोण कल्पना देखील केली नसेल. नवरी केवळ गिटार वाजवत नसून गाणेही म्हणत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सहसा वधू मूह दिखाईच्या वेळी नवरी फक्त बसून राहते आणि वडीधारे येऊन तिला आशीर्वाद देतात. पण या वधूने आपले स्कील दाखवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @lagavbatti या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्ने नवरी तर रॉकस्टार म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने वाह, क्या बात हैं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने आता शेजारच्या काकू चुगल्या करतील असे म्हटले आहे. आणखी एका युजरने हे भारी होते असे म्हटले आहे. तर आणखी एकाने हीने तर सासू आणि नवऱ्याचेही मन जिंकले असणार आहे. मॉर्डन ब्यूटी विथ पांरपारिक टच असे म्हटले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हार्टचे इमोजी देखील शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.