जर्मन राजदूताचा भारतीय अंदाज; नवीन कारमध्ये मिरची आणि लिंबू; पाहून नेटकरी म्हणाले
सोशल मीडियावर रोज काही ना कही व्हायरल होत असते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात.भारतात एखाद्या नवीन गोष्टीचे वाईट प्रवृत्तींपासून सुरूक्षा करण्यासाठी लिंबू मिर्ची बाधण्याची प्रथा आहे. अनेक वर्षांपासून ही प्रथा आपल्या भारतात आहे. मात्र आता फक्त भारतीयच नाही तर परदेशी देखील भारताच्या काही प्रथांचे पालन करताना दिसतात.
भारतातील जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन सध्या चर्चेत आहेत. अकरमन यांनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचेही कौतुक केले आहे. पुन्हा एकदा त्यांनी असे काही केले आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर्मन राजदूताने त्यांच्या कार्यालयासाठी नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या नवीन चमकणाऱ्या BMW कारमध्ये बसण्यापूर्वी अकरमनने त्यात ‘लिंबू-मिरची’ बांधली आणि नंतर नारळही फोडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ जर्मन राजदूत फिलिप अकरमन यांच्या कार्यालयाबाहेर शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कारचे उद्घाटन करताना तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम ते कारवरील कव्हर काढतात. नंतर त्यावर जर्मन राष्ट्रध्वज लावतात. त्यानंतर ते कारच्या मागील व्ह्यू मिररभोवती ‘लिंबू-मिरची’ बांधताना तुम्ही पाहू शकता. याशिवाय ते नारळही फोडतात. डिप्लोमॅटिक निळ्या नंबर प्लेटवर वाहनाचा नोंदणी क्रमांक 27 CD1 लिहिलेला दिसतो.
हे देखील वाचा- Viral Video: चेन हिसकावून पळण्याच्या तयारीत होता चोर इतक्यात….; पाहा पुढे काय घडले
व्हायरल व्हिडिओ
#WATCH | Delhi: German Ambassador to India, Philipp Ackermann switches to EV (electric vehicle); ties ‘nimbu-mirchi’ to his car and smashes a coconut on the occasion. pic.twitter.com/OojZh4Nvx3
— ANI (@ANI) October 15, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ भारतीय लोकांच्या पसंतीस पडत आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून लाईक आणि शेअर केला आहे. अनेकांनी यावर आपली मते देखील मांडली आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारतीय परंपरांचे पालन केल्यास काही लोकांना पोटदुखीचा त्रास सुरू होईल. दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, स्वस्तिकही बनवायला हवे होते, सर तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, देसी संस्कृती, परदेशी पाहुणे. तसेच अनेकजण हे पाहून हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होताना दिसत आहे.
हे देखील वाचा- जोरात समुद्राची लाट आली अन् चिमुकला वाहून जाणार इतक्यात…; घटनेचा थरारक व्हिडिओ