Viral Video: सिग्नल लागला अन् तरूणीने भररस्त्यात केले असा डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले..
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसावे की रडावे हे कळत नाही. कधी डान्स रील्स, तर कधी भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा तरूण मुले-मुली रील बनवायच्या नादात असे काही कृत्य करतात की पाहून त्यांनी काय बोलावे ते कळत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरूणीने भर रस्त्यात असे काही केले आहे की पाहून लोक हैराण झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल काही लोक रील बनवायच्या नादात असे काही करतात की अशा लोकांना काय बोलावे ते कळत नाही. मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.
तरूणीने नेमके काय केले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी रस्त्याच्या मधोमध येऊन उभी राहते. नंतर ती, तिच्या हातात असलेली एक बॅग फेकून देते. त्यानंतर ती अचानक रस्त्यावर झोपते आणि असे काही करू लागते की, सगळे लोक तिला पाहतच राहतात. वास्तविक या तरूणीने झोपून डान्स करण्यास सुरूवात केली आहे. तिच्या आजूबाजून अनेक वाहने जात आहेत पण तिला कोणतीच भिती वाटत नाही. अनेकजण गाडी थांबवून तिच्याकडे आश्चर्याने बघत आहेत. तरीही ही तरूणी तशीच डान्स करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर marathi_songs143 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, दीदी घरी जाऊन डान्स कर, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाईईईईईईई हा काय प्रकार, आणखी एका युजरने रीलसाठी लोक काहीही करू शकतात असे म्हटले आहे, तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा मुलींमुळे बाकीच्या सगळ्या मुलींचे नाव खराब होते. तसेच एकाने यावर म्हटले आहे की, मग एखाद्याने यांची छळ काढली की, यांना राग येतो, असे कृत्य करताना अजीबात लाज वाटत नाही.
हे देखील वाचा- नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर महिलेने मुलांसोबत केले असे काही…; पाहून नेटकरी म्हणाले