फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला दिसतात जे पाहून धक्का बसतो, तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पुन्हा पुन्हा पाहिल्याशिवाय राहत नाही. तसेच तुम्ही सोशल मीडियावर भांडणाचे, स्टंटचे, जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. भांडणाचे अनेक व्हिडिओ तर सतत व्हायरल होत असतात. असाच एक नवरा-बायकोच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कारण महिलेने नवऱ्याशी भांडण केल्या नंतर रागात येऊन मुलांना शिक्षा दिली आहे. हा व्हिडिओ चीनमधील असल्याचा व्हिडिओत सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे. कारण तिने नवऱ्याला त्रास देण्यासाठी तिच्या दोन लहान मुलांना 23व्या मजल्यावरील खिडकीबाहेर एसी युनिटवर बसवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने लहान मुलांना खिडकीच्या बाहेर एसी युनिटवर बसवलेले आहे. आणि ती स्वत: देखील खिडकीमध्ये बसलेली आहे. ती तिच्या नवऱ्या सोबत भांडताना दिसत आहे. हे दृश्य 23 व्या मजल्यावर असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत सांगण्यात आले आहे की, ही घटना 10 ऑक्टोबर रोजी मध्य चीनच्या हेनान प्रांतातील घडली आहे. मुलांच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू आल्याने ते तात्काळ घरातून बाहेर आले आणि मुलांना या अवस्थेत पाहून घाबरले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक पाठवले आणि त्या मुलांना वाचवले.
हे देखील वाचा- बाप रे! तरूणाने सापाला दिला CPR पण पुढे जे घडले…; पाहून बसेल धक्का, व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
10月10日(发布时间),河南洛阳,一网友称对面楼夫妻一大早吵架,妻子把两个孩子放在23楼空调外机上和丈夫较劲,死活不让孩子进去,孩子吓得大哭。这样的人就不配当父母。 pic.twitter.com/dlpkpHDPBp
— Jacobson🌎🌸贴贴BOT (@jakobsonradical) October 11, 2024
नेटकऱ्यांची प्रतिक्रीया
या जोडप्यात वाद कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवरआपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘ती कोणत्या प्रकारची आई आहे? या आईने स्वतःच्या मुलांचा जीव धोक्यात टाकला. तर दुसऱ्या एकाने म्हटले की,- ‘या महिलेने तिचे मानसिक संतुलन गमावले आहे. जर मुलांसोबत कोणतीही घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असते? आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘ही महिला आई म्हणवून घेण्यास योग्य नाही.’ अशा प्रतिक्रीया लोकांना व्यक्त केल्या आहेत.