viral video girl earned thousand's of ruppes buy chwed chewing gum video goes viral
सोशल मीडियावर कधी काय विचित्र गोष्टी पाहायला मिळतील याचा नेम नाही. डान्स, रिल्स, स्टंट, जुगाड, यासांरखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळातात. तसेच बिझनेस रिलेटेड देखील व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलीकडच्या काळात पैसे कमवण्यासाठी सोशल मीडियाच्या उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कोणीही कोणताही बिझनेस सुरु करुन लाखो रुपये कमवत आहे. कोणी मीठी मारुन, तर कोणी घाम विकूण करोडो रुपये घेत आहे.
आता हेच पाहा ना या ब्राझीलच्या कंटेट क्रिएटरने विचित्र काम करुन हजारो रुपये कमवले आहेत. हा आकाडा वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. एका व्हिडिओत तिने स्वत: याबाबत सत्य उघड केले आहे. या तरुणीने खालेल्ल च्युंइगम ऑनलाईन विकून पैसे कमावले आहे. अनेकजण यासाठी लाखो रुपये देत आहे. आतापर्यंत तिने या विचित्र बिझनेसच्या माध्यमातून 75 हजार रुपये कमाई केली आहे. या तरुणीचे वय 21 वर्ष असून ही तरुणी मॉडेल आणि कंटेंट क्रिएशनचे काम करते. सध्या ही तरुणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 9 लाख फॉलोवर्स आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या बिझनेसची आयडिया तिला कसी आली याचा देखील एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, एका फॉलोवरनं तिला मेसेज करुन विचित्र डिमांड केली होती. त्याने तिला तिने चघळलेले च्युइंगम पाठवण्याची मागणी केली होती. यासाठी तो भरपूर पैसेही देत होता. याशिवाय तिला तिचे सॉक्स आणि अंडरगारमेंट्स देखील मागितले होते. यासाठी अनेकांनी तिला लाखो रुपये दिले आहेत. सध्या हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी काय विचित्रपणा आहे असे म्हटले आहे. तर काहींनी बिझनेस आयडिया चांगली आहे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kinechan2.0 या अकाऊंटवर स्वत: तरुणीने केला आहे. तिच्या या व्हिडिओला हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.