Viral Video: 'उफ तेरी अदा' गाण्यावर काकांनी केला 'असा' डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले... (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण असे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच तुम्ही लग्न समारंभीतील नवरा-नवरीचे, त्यांच्या नावेतवाईकांचे डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील.यामध्ये कोणी ना कोणी अति उत्साही लोक असतात, जे भलत्याच स्टाईमध्ये डान्स करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका लग्न समारंभातील गण्याच्या कार्यक्रमातील आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका काकांनी उफ तेरी अदा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काका एकटेच महिलांच्यामधे जाऊन नाचत आहेत. महिलादेखील त्यांनी प्रोत्साहन देत आहेत. नाचताना ते मायकल जॅक्सनच्या स्टाईलमध्ये कंबर हलवत आहेत. त्यांचा डान्स मायकल जॅक्सनच्या डान्सपेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी याचा आनंद लुटला आहे. काका डान्स करत असताना आणखी एक आजोबा देखील त्यांना जॉइन करुन माइकल स्टाईमध्ये डान्स करु लागतात. घरातील महिला दोघांनाही टाळ्या वाजवून, ओरडून एन्जॉय करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @we.india या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देत व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका युजरने “काकांनी ज्या पद्धतीने डान्सचा आनंद घेतला तो परिपूर्ण आनंद आहे.” असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, “काका मायकल जॅक्सन निघाले”. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “आपल्या सर्वांचा एक नातेवाईक असा नाचतोच.” असे म्हटले आहे. आणखी एकाने काकांना मनसोक्त नाचताना पाहून आनंद झाला असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या आनंदाचा कारण बनला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.