बाईकवर उघडले सलून; या अनोख्या जुगाडाने वेधले हर्ष गोयंकाचे लक्ष
अलीकडे सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. मीडिया प्लॅटफॉर्म्सवर असे असे व्हिडीओ व्हायरल होतात की, हसूहसून पोट दुखून येते. आपल्या देशात जुगाड करणाऱ्यांची संख्या तर अजिबात कमी नाही. लोक असे असे जुगाड करतात की विश्वास बसत नाही. जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की, यामुळे पैसे आणि वेळही वाचतो. काही वेळा असे जुगाड उपयोगी येतात. तर काही वेळा जुगाड खूप भारी पडतात. सध्या एका जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यात पडले आहेत.
भारतात तर जुगाड करणारे भरपूर लोक आहेत. या जुगाड करणार् लोकांचे म्हणणे असते की, यामुळे त्यांचा पैसै आणि वेळ वाचतो. अनेकदा काही जुगाड खूप विचित्र असतात. तर काही जुगाड लोकांना खूप उपयोगी पडतात. सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हर्ष गोयंका यांनी त्याच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. एका माणसाने चालते फिरते सलून बाईकवर उघडले आहे.
चालते फिरते सलून
तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे सलून पाहिले असतील. महागड्या आणि स्वस्त सलून व्यतिरिक्त, तुम्ही झाडाखाली उघडलेले सलून देखील पाहिले असतील. पण तुम्ही कधी बाईक सलून पाहिले आहे का? व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने त्या बाईकवरच सलून उघडले आहे. त्याने बाईकच्या निम्या भागावर माणसाने चालते फिरते सलून बांधले आहे. त्या व्यक्तीने बाईकची अर्धी सीट सोडली आहे आणि मागे एक छोटा सलून बसवला आहे. त्याचा समतोल साधण्यासाठी तळाशी दोन चाके बसवली आहेत. सलूनमध्ये एका बाजूला आवश्यक वस्तू ठेवल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक खुर्ची आहे ज्यावर एका व्यक्तीची सलूनवाला दाढी करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
Amazing jugaad- a mobile saloon! pic.twitter.com/Bld33olwXo
— Harsh Goenka (@hvgoenka) August 21, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या व्हिडीओने हर्ष गोयंका यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, ‘अमेझिंग जुगाड – एक मोबाइल सलून.’ आतापर्यंत 54 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, ‘भारतात काहीही होऊ शकते, लोकांच्या क्रिएटिव्हिटीला उत्तर नाही.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जर इनोव्हेशनसाठी काही डीएनए असेल तर ते भारत असेल.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, ‘हे खरोखर आश्चर्यकारक आहे. आणखी एका यूजरने लिहिले – ‘हे आळशी लोकांसाठी खूप उपयुक्त आहे.’