शेवटी आईच ती! बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई लोकांकडे विनवणी करू लागली, Video Viral
आईला ममतेचे प्रतीक मानले जाते. साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी आई आपली साथ कधीच सोडत नाही. आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. आई जेवढी ममतेने काठोकाठ भरली असली तरी आपल्या मुलाच्या संरक्षसांसाठी वाटेल ते करायला तयार असते. फक्त माणूसच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही आईची माया काही वेगळी नाही. सध्या सोशल मीडियावर आईच्या मायचे दर्शन घडवून आणणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात बिबट्याचे पिल्लू विहरीत पडल्याने त्याची आई माणसाकडे कशी विनवणी करत मदत मागते ते दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण भावुक झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मादी बिबट्या दिसेल. हा बिबट्या माणसांजवळ जाऊन त्यांचा हात धरण्याचा प्रयत्न करत आहे. सुरवातीला हा व्हिडिओ पाहताच तुम्हाला वाटेल की बिबट्या लोकांना त्रास देत आहे. मात्र असे नाही आपल्या मुलाला विहरीतून बाहेर काढण्यासाठी ती लोकांकडे मदत मागत असते. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बिबट्या माणसांजवळ जातो त्यांचे हात पकडतो पण कोणीही त्याला मदत करत नाही पण जेव्हा लक्षात येते की बिबट्या मदत मागत आहे तेव्हा एक गाडी बिबट्याच्या मागे जाते आणि नंतर लक्षात येते की बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
पुढे व्हिडिओत पाहिल्यावर दिसते की, पोलीस आणि काही माणसं बिबट्याचे पिल्लू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात आणि यात ते यशस्वी ठरतात. बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढले जाते आणि मादी बिबट्या हे दुरवरूनच पाहत राहते. हा हृदयद्रावक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हेदेखील वाचा – दगडाच्या आत दडला होता अद्भुत इजिप्शियन खजिना, पाहून लोक थक्क, Viral Video पाहिलात का?
हा व्हिडिओ @kamapurta._.mama नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, “बिबट्याचे पिल्लू विहरीत पडल्यावर त्याची आई मदत मागण्यासाठी माणसांमध्ये आली”. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “आईसारखी माया कुठेच नसते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “आई काली माताही होऊ शकते बाळासाठी आणि ती कितीही कठोर असेल तरी शत्रूंसमोर झुकू पण शकते, फक्त बाळासाठी, एवढे समजलं”.