क्षणात डाव पलटला! सिंहांनी मगरीला चारीबाजूने घेरलं पण... ; शेवटी घडलं ते अनपेक्षित, Video Viral (फोटो सौजन्य: व्हायरल व्हिडिओ)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडिओ मजेशीर, तर काही व्हिडिओ विचित्र, भयावह असतात. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स, भांडणांचे असे अनेक प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच प्राण्यांचे पशु-पक्ष्यांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे वाइल्ड लाईफ लव्हर्स अनेक प्राण्यांचे थरारक, थक्क करुन सोडणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करच आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही सिंह, वाघ, बिबट्या यांसरख्या प्राण्यांना घार, घुबड यांसरख्या पक्ष्यांना शिकार करताना पाहिले असतील. अनेक मगरींच्या शिकारीचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले आहे. हे प्राणी आपली शिकार कशा पद्धतीने करतात, कसे एखाद्याला आपल्या जाळ्यात ओढतात अशा थरारक दृश्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक सिंहाच्या कळपाच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
खरं तरं सिंह हा जंगालाचा राजा. त्याच्या ताकदीपुढे कोणीही टिकणे कठीणच आहे. सिंहाचे नाव जरी ऐकले तर भल्या भल्यांना घाम फुटतो. पण जगंलाच्या राजासारखेचे इतर प्राणी देखील आपल्या कौशल्यात मागे नाही. आता हेच पाहा ना. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहाचा कळप मगरीची शिकार करताना दिसत आहे, परंतु पुढच्याच क्षण असे काही घडले आहे की, ज्याचा कोणी विचार काय कल्पना देखील केली नसले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हलक्या पाण्यामध्ये एक मग शांतपणे पडलेली आहे. याच वेळी एक सिंहाचा कळप येथे येतो. सिंहाच्या कळपाने मगरीला चारीबाजूंनी घेरलेले दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, एक सिंह मगरीजवळ असून तिच्यावर हल्ला करायला जातो. मगर देखील सिंहावर वार करते. याच वेळी अचानक इतर दोन सिंह देखील तिच्यावर हल्ला करायला येतात. पण तुम्ही पाहू शकता की, मगर देखील तितक्याच वेगाने आणि ताकदीने हल्ला करत स्वत:चा बचाव करत आहे. यामुळे सिंहाची देखील पळता भूई झाली आहे.
अखेर नागिणीने शिकार केलीच! तरुणीचा अतरंगी कारनामा; जिंवत बेडकाला बनवले गळ्यातील नेकलेस, Video Viral
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. या थरारक आणि थक्क करुन सोडणाऱ्या दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.