'मेरा भाई तू मेरी जान है' भावाला मारल्याने चिमुकली आईवरच रागवली; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडिया की आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. तसेच अनेक लहान मुलांचे अनेक निरागस व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा ही लहान मुले असे काही बोलतात की, सगळेच आवाक् होऊन जातात. याशिवाय लहान भावा-बहिणींचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या असाच एक निरागस भावा-बहिणीच्या नात्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. भावा-बहिणीचे नाते अगदी निर्मळ आणि वेगळेचत असते. दोघे सारखे भांडत असले तरी एकमेंकाजवळ पुन्हा येतात. एकाला जरी काही झाले तर दुसरा त्याची काळजी घेतो. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. आईने आपल्या भावाला मारल्यावर चिमुकली आईवरच रागवली आहे. आणि तिच्याशी भांडत आहे.
आईवर रागवली चिमुकली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन छोटे बहिण भाऊ एकमेकांना मिठी मारून उभे आहेत. दोघेही रडताना दिसत आहेत. चिमुकली आईवर रागवताना दिसत आहे. ती आईला म्हणत आहे की, माझ्या भावाला मारले ना तर मी तुला चतांगली रागवेल. तर आई म्हणते की, मग त्याला सांग तो माती का खातो, तर ती चिमुकली म्हणते मी तुझे नाव सांगणार आहे पप्पांना आई परत तेच म्हणते, मग हा माती का खातोय, तू त्याला रागव. यावर चिमुकली परत एकदा जोरात ओरडत म्हणते की, माझ्या भावाला मारायचे नाही. मग ती भावाला किस करते आणि माझे सोनु असे म्हणते. तिचा भाऊ तिला मिठी मारून रडत असतो.
व्हायरल व्हिडिओ
नेटरकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या भावा-बहिणीच्या निरागस व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांचे मन जिंकले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर syed_afjal_ali_786 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओला पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, अय्या किती गोड, भावा-बहिणीचे नाते असेच असते कितीही भांडण झाले तरी पुन्हा एकत्र येतात. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, किती गोड दिसतेय ती भांडताना, आणखी एका युजरने म्हटले आहे की, मलाही अशी बहिण हवी आहे. तर अनेकांनी व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बहिण आपल्या भावाला कधीही संकटात पाहू शकत नाही, भावासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते.