फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे धक्कादायक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून आपले हसू आवरत नाही. कधी भांडणाचे, कधी जुगाड आणि स्टंटचे तर कधी डान्स रील्स असे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळ्याच जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेकजण हसूहसून लोट पोट झाले आहेत. हा व्हिडिओ स्वत: उद्योगपति हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट अशा प्रतिक्राया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओत एका महिले अशा पद्धतीने पोळ्या लाटल्या आहेत की पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरा-बायको स्वयंपाक करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बायको नवऱ्यात्या डोक्यावर पोळ्या लाटताना दिसत आहे. तर नवरा चपाती शेकून घेत आहे आणि बायकोला पीठाचे गोळे करून देताना दिसत आहे. ती महिला नवऱ्याच्या डोक्यावर पीठ टाकून देखील पोळ्या लाटत आहे. महिला त्याच्या डोक्यावर परफेक्ट अशा गोल पोळ्या लाटत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओने अनेकांना हैराण करून सोडले आहे.
व्हायरल व्हिडिओ
Your dinner is getting ready 😀! pic.twitter.com/wOdm5COqvW
— Harsh Goenka (@hvgoenka) October 21, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपति हर्ष गोयंका यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर hvgoenka शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तुमचे जेवण तयार होत आहे आणि सोबत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्राया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा जुगाड भारताबाहेर जायला नको, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नवऱ्याचा चांगला उपयोग केला हिने, आणखी एका युजरने म्हटले आहे की, महिलांचे डोकं अशा गोष्टीत जास्त चालते.