चाचा विधायक है! रस्त्याच्या मधोमध गाडी पार्क करुन पठ्ठ्या गायब...; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. रोज काही ना काही मजेदार किंवा अनोख्या गोष्टींचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशा गोष्टी पाहून लोक आश्चर्यचकित होतात. कधी डान्स, तर कधी स्टंट तसेच कधी जुगाड तर कधी भांडणांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय खाण्याशी संबंधित तसेच लग्नाशी संबंधित व्हिडिओही व्हायरल होत असतात.
अनेकदा असे व्हिडिओ पाहून हसूनहसून पोट दुखून येते. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एखाद्या चित्रपटाच्या सीनची आठवण होईल. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप काही माहिती नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणे कठीण होईल. जाणून घेऊयात नेमके काय आहे व्हिडिओमध्ये.
रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. ती अचानक लेफ्ट साइडचा इंडिकेटर देते आणि एका ठिकाणी थांबते. कार पुढे गेल्यावर कारण समजते. तुम्हाला लक्षात येईल की, एका व्यक्तीने चक्क आपली बाइक रस्त्याच्या मधोमध पार्क करून ठेवली आहे. हा सीन पाहून अनेकांना ‘बरेली की बर्फी’ चित्रपटातील प्रीतम विद्रोहीचा सीन आठवला, जिथे त्याने रस्त्यात गाडी उभी केली होती. परंतु, तो चित्रपट होता आणि हा खरा प्रकार आहे, त्यामुळेच या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्यावाचण्यासाठी येथे क्किक करा
व्हायरल व्हिडिओ
??😭
pic.twitter.com/BofC4VK9Zl— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 7, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओने खूप लोकप्रियता मिळवली आहे. व्हिडिओला 60 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘अरे, ही तर प्रीतम विद्रोही यांची गाडी आहे, बरेली की बर्फीमधली.’ दुसऱ्या एका युजरने ‘ही कोणती स्टाईल आहे?’ असे म्हटले आहे.
तर आणखी एकाने , ‘हा कोण महाभाग आहे ज्याने हे कारनामे केले आहेत?’ असे म्हटले आहे. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘लगता है इनके चाचा विधायक है!’ अशी कमेंट केली आहे. लोकांच्या अशा प्रतिक्रिया आणि त्यावरील चर्चेमुळे हा व्हिडिओ अधिकच मनोरंजक बनला आहे. चित्रपटातील प्रसंग वास्तवात अनुभवायला मिळाल्याने लोकांना हा प्रकार खूप गमतीदार वाटत आहे. अशा भन्नाट गोष्टींच्या व्हिडिओमुळेच सोशल मीडियावर हास्याचे फवारे उडत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.