शेवटी आई ती आईच! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन् आईने..; पुढे काय घडले तुम्हीच पाहा
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही हिरकणीची गोष्ट तर नक्कीच ऐकली असेल.आपले बाळ एकटे घरी आहे त्याला भूक लागली असेल. या काळजीने एका आईने रात्रीच्या काळोख्यात गड उतरला. याशिवाय आत्ता देखील अनेक असे आईच्या धाडसाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. आपण नेहमी म्हणतो आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही.
आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते.अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, मृत्यूच्या विळख्यातून देखील आईने आपल्या मुलांना वाचवले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे अद्याप याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरा बायको त्यांच्या लहान चिमुकलीला घेऊन बाहेर चालले आहेत. महिला बाईकवर बसून मुलाला घेण्याचा प्रयत्न करते. पण चिमुकली अचानक रस्त्याच्या दिशेने धावत असते. इतक्यात रस्त्याच्या दुसर्या बाजूने एक कार येत असते. कारला पाहताच आई मूलीच्या दिशेने विलंब न करता मागे पळत सुटते. आई धावत जाभन मुलीला पकडते. चिमुकलीजवळ कार पोहोचण्याच्या आधीच आई तिला पकडते. तोल गेल्यामुळे दोघीह खाली कोसळतात. या घटनेमुळे आजूबाजूनला गर्दी जमा होते. मुलीचे वडील देखील धावत येतात आणि मुलीला उचलतात.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sp__prithivi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. अनेकांनी आईच्या सावधपणेचे कौतुक कले आहे.तसेच आईला आणि मुलीला काही झाले नाही ना असे विचारले आहे. एका युजरने म्हटले आहे की, म्हणूनच देवाने आईला बनवले आहे, माते सलाम तुला. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, शेवटी आई ती आईच असते. अशा कौतुकास्पद प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.