फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो की, आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहतो की, हसून पोट दुखून येते. तसेच अनेक जुगाड, स्टंट आणि भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या लोकांनी रिल्स बनवण्याची अशी क्रेझ लागली आहे की, अनेकदा हे लोक असे स्टंट करतात की जीव धोक्यात येतो.
स्टंट करताना हे देखील पाहात नाही की, 30 सेकंदाच्या रिलसाठी आपला जीव जाणयाची देखील शक्यता आहे. आता हेच पाहा ना एका पठ्ठ्याने तर रिलसाठी सरळ आपली ठार गाडी रेल्वेरूळावर घेतली आहे. आणि तो स्टंट करणार इतक्यात त्याच्या स्टंट फसला आणि असे काही घडले की पाहून थरकाप उडेल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र असे व्हिडिओ पाहून एकट प्रश्न मनात येत आहे की, जीव इतका स्वस्त झाला आहे का?
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे रूळाचा परिसर दिसत असून तिथे अनेक नागरिकांची गर्दी झालेली आहे. तिथेच रेल्वे रूळावर एक थार कार देखील दिसत आहे. मात्र रेल्वे रूळावर ही कार अडकलेली असून चालक ती बाहेर काढण्याच प्रयत्न करत आहे. तसेच त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी देखील दिसत आहेत. एका बाजूला ट्रेन थांबलेली आहे. काही वेळाने चालक थार तिथून काढतो आणि पळून जातो. हा सर्व नागरिक बघतच राहतात. पोलिस देखील तिथेच उभे राहून असतात.
हे देखील वाचा- आता तर हद्दच झाली! महिलेने असं काही चोरी केलं की; व्हिडिओ पाहून कपाळाला हात लावाल
व्हायरल व्हिडिओ
In Jaipur, some guys rented a Thar and were performing stunts on a live railway track.
pic.twitter.com/xAiWTapOev— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 14, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ जयपूरमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, बाई काय हा प्रकार,तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, पोलिस फक्त पाहात आहेत. आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्याच्या थारचा चुरा व्हायला पाहिजे होता. अशा प्रतिक्रीया लोकांनी व्हिडिओवर दिल्या आहेत.
हे देखील वाचा- नाद खुळा! चंद्रा गाण्यावर काका-काकूंनी धरला ठुमका; व्हिडिओ तुफान व्हायरल…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.