viral video Mumbai A young man sitting on the bonnet of a moving video goes viral
अलीकडे सोशल मीडियावर धोकादायक स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. प्रसिद्धीसाठी, हिरोगिरीसाठी स्टंट करण्याचे प्रमाणा दिवसेंदिवस वाढत आहे. पण यामुळे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होताचा त्यांच्यावर लगेच कारवाई केली जात आहे. ही एक चांगली बाब असून यामुळे स्टंट करणे किती महागांत पडू शकते हे लोकांच्या ध्यानात येईल. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण एका धावत्या चारचाकीच्या बोनेटवर झोपलेला दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण यानंतर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. यामुळे तरुणाला त्याची स्टंटबाजी चांगलीच महगात पडली आहे.
ही घटना मुंबईच्या वांद्रे परिसरात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती गाडीच्या बोनेटवर झोपलेला आहे. तर एक व्यक्ती ती गाडी वाऱ्याच्या वेगाने चालवत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करुन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी देखील व्हिडिओ हाती लागताच, दोन्ही व्यक्तींना पकडून त्यांच्यावर या प्रकरणात कारवाई केली जाईल असे म्हटले. या व्हिडिओमध्ये तरुण वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करताना स्पष्ट दिसत आहे.
वाहतूकीच्या नियम हे आपल्या सुरक्षेसाठी असतात, परंतु तरीही अनेक लोक या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. हेल्मेटचा वापर न करणे, सिग्नल तोडणे, वेगाने गाडी चालवणे अशा गोष्टी करुन लोक स्वत:चा जीव गमावून बसतात. शिवाय या स्टंटबाजीमुळे देखील अनेकजणांना त्यांच्या जीव गमवावा लागला आहे. पण तरीही लोक त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
⚠️ A young man was seen lying on a moving electric car bonnet on Carter Road around 12:27 am on 7th June, raising serious safety concerns. This reckless behavior highlights the urgent need for stricter traffic regulations. (1/2) pic.twitter.com/wZ9zVAxMqt
— Bandra Buzz (@bandrabuzz) June 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bandrabuzz या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मुबंई पोलिसांनी देखील दोन्ही व्यक्तींवर लवकर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. मुबंई पोलिसांनी दोन्ही व्यक्तींचा शोध सुरु केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.