मुलाने माकडाला गरागरा फिरवले
सोशल मीडियावर कधी काय पाहाला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ पाहायला मिळतात की, डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर अनेकदा हास्यस्पद व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स रील्स, जुगाड, स्टंट आणि भांडण असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच अनेक प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सतत समोर येतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्या कपाळाला हात लावला आहे.
एका लहान मुलाचा हा व्हिडिओ आहे. काही मुले इतकी दुष्ट असतात की, सतत काही ना काही खोड्या करत राहतात. अनेकदा ही मुले असे काही करतात की त्यांना काय बोलावे समजत नाहीत. त्यांच्या शरीरात दिवसभर एक विचित्र प्रकारची उर्जा पसरलेली असते की ते काही ना काही उत्पात करत असतात. सध्या अशाच एका खोडकर मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो एका माकडासोबत गैरकृत्य करत आहे. मुलाच्या या कृतीने माकडही चक्रावले.
माकडाला गरागरा फिरवले
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मूल हळू हळू त्याच्या गच्चीवर बसलेल्या माकडाच्या जवळ जात आहे. मग तो टाळ्या वाजवत माकडासमोर हात पुढे करतो. यावर ते माकड रागाने त्या मुलाकडे पाहते. अशा वेळी, तो मुलगा त्यामाकडाचे हात आपल्या हातांनी पकडतो अचानक पकडतो. त्यांनतर तो असे काही करतो की तुमचे डोके चक्रावेल. तो माकडाचा हात पकडून त्याला हवेत गोल गोल फिरवू लागतो. मुलाचे हे कृत्य पाहून माकडही थक्क झाले. त्यालाही समजत नाही की त्याला काय होत आहे. थोडा वेळ हवेत फिरवल्यानंतर तो माकडाला सोडूनन देतो. त्यानंतर माकडाला चक्कर येऊ लागते आणि तो थक्क झालेल्या अवस्थेत एका जागी शांतपणे बसतो.
व्हायरल व्हिडिओ
यह किसका लड़का है? बहुत खतरनाक है😂😂 pic.twitter.com/ZL6lQHgVjm
— Anika Pandey (@Anika_Pan) October 19, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Anika_Pan या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाख लोकांनी पाहिले आहे आणि हजारो लोकांनी लाईक केले आहे. यावर व्हिडिओवर हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रीयाही दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की माकडाची संपूर्ण दुनियाच हालली असेल. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मुलाने दिवसा माकडाला तारे दाखवले. आणखी एका युजरने म्हटले आहे की, माकडाने खूप चापट मारली की कळेल त्याला. तसेच एका युजरने म्हटले आहे की, माकड आता त्यांच्या गच्चीवर पुन्हा कधीच येणार नाही. तर अनेकांनी त्या मुलाला फटकारले पाहिजे असे म्हटले आहे.
हे देखील वाचा- आता तर हद्दच झाली! तरूणाचा उलटे बसून बाईक चालवण्याचा स्टंट; व्हिडिओ व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.