फोटो सौजन्य: व्हिडिओ सक्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही.अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी भांडणाचे, कधी स्टंटचे, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला प्रत्येक दुसरा व्यक्ती सापडेल जो रील बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो.
सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसून हसून पोट दुखून आले आहे. काल देखील याच मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी तरूणीने मेट्रोमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहून मेट्रोतील लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फोन चालू करून तरूणी पळून गेली
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणीने तिचा फोन स्टीलच्या खांबावर ठेकवून मेट्रोच्या फरशीवर सोडला होता. मग ती रील बनवालयला सुरू करते. आणि उभी राहून चालायला लागते. त्यानंतर तेथून पळून जाते. प्रवाशांच्या प्रतिक्रिया अतिशय मनोरंजक आहेत. काही लोक घाबरतात की काहीतरी चूक झाली आहे. तर काहीजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ बनवून तिने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. व्हिडिओमध्ये या तरूणीने ‘मेरे दिल की धडकन बोले’ या गाण्यावर अनोखी रील बनवली आहे. अशी रील बनवण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेक अनोख्या रील्स बनवल्या आहेत. या रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा- आता तर हद्दच झाली! तरूणाचा उलटे बसून बाईक चालवण्याचा स्टंट; व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @khushivideos1m या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक हैराण झाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चक्क “कोणीही फोन घेऊन पळून गेले नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, दिदी एक दिवस फोन चोरीला जाईल, असे करू नका, आणखी एका युजरने म्हटले आहे की, दिदी तुमच्या रील्स खूप छान असतात. असे व्हिडिओ केवळ मनोरंजनच करत नाहीत तर एक नवीन ट्रेंडही तयार करतात.
हे देखील वाचा- धक्कादायक! रीलसाठी धावत्या ट्रेनमधून तरूणांची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले