महिलेचा योगा पाहून नेटकरी हसूनहसून लोटपोट
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळं पाहायल मिळतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे पाहून हसूनहसून पोट दुखून येते सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी दखील भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक महिला विचित्र पद्धतीने योगा करत आहे. तिच्यासोबत आणखी काही महिला देखील आहेत.
व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला हसावे की रडावे हे देखील कळणार नाही. अलीकडच्या धकधकीच्या काळात आरोग्य सुधारणअयासाठी आहारासोबत व्यायाम देकील महत्त्वाचा आहे. व्यायमाच्या माध्यमातून आपण आपले शरीर निरोगी ठेवू शकतोच. पण त्याशिवाय मन देखील शांत राहते. अनेजण यासाठी रोज योगा करतात. पण काहींना कामाच्या धावपळीत हे करायला जमत नाही. विशेषत: बायकांना त्यांच्या धावपळीच्या कामातून वेळ काढणे कठीण जाते. पण आता त्या देखील स्वतसाठी वेळ काढू लागल्या आहेत. अशाच काही महिलांचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण या महिला एतक्या विचित्र पद्धतूने योगा करत आहेत की हसूहसून तुमचे पोट दुखून येईल.
योगा पाहून लोक घाबरून जातील
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही महिला योगा करण्यासाठी एका ठिकाणी जमल्या आहेत. सर्व महिला योगा मॅट टाकून उभ्या आहेत. त्यांच्या समोर एक महिला उभी आहे. जी त्यांना योगा कसा करायचा हे शिकवत आहे. हि महिला आपले दोन्ही होत हवेत उचलून जीभ बाहेर काढूते आणि डोळे मोठे करून योगा करते. अशाप्रकारचा योगा कदाचित कोणी पाहिला असेल. तिथे असलेल्या महिला देखील तसेच करत आहेत. हे योगासन आहे की कुठला दुसरा प्रकार असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अआनेकजण त्यांना घाबरून पळून जातील असे वाटत आहे.
व्हायरल व्हिडीओ
ये देख के बाबा रामदेव ने भी अपना सर धुन लिया ये चुड़ैल योगा कब आया मार्केट में 😝😝😝 pic.twitter.com/XTeUy7XnAr
— लाडला बापू का 🙏 (@BapuDaLadla) September 11, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ सर्व सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BapuDaLadla या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, काकू थोडे दमाने, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘बाई काय हा प्रकार’ तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्या बरोबर करत आहे, आपण चुकीचा योगा करत होतो आत्तापर्यंत.