Mumbaikars enjoy heavy rain video goes viral
सध्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले आहे. पुणे, रत्नागिरी, चिपळून, मुंबई यांसारख्या जिल्ह्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मुबंईमध्ये तर अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. संपूर्ण मुंबई पाण्यामध्ये बुडाली आहे. सध्या याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या मुसळधार पावसातही, कठीण परिस्थितीही लोकांनी आनंद शोधला आहे. गोरेगावमध्ये तर ओबेरॉय मॉल बाहेर प्रचंड पाणी साठले असून स्वीमिंग पूलच तयार झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये मुले पोहण्याचा आनंद घेताना दिसत आहे. जणू वॉटरपार्क असल्यासारखे लोक एन्जॉय करत आहेत. याच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
खाली दिलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ओबेरॉय मॉलबाहेर पावसाचे पाणी साठले आहे. मोठी नदी, तळे निर्माण झाल्यासारखे ते दिसत आहे. यामध्ये लोक पोहोताना दिसत आहे.
This is the scene in front of Goregaon Oberoi Mall, which is supposed to be the most posh area.
God bless this country and its corruption 😭🇮🇳#MumbaiRains pic.twitter.com/m1YnnmPjA1— Thandaitweets (@mohit_blogg) August 19, 2025
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती पाऊस सुरु असूनही बाहेरच्या बाजूला खुर्ची टाकून बसले आहेत. दोन वृद्ध व्यक्ती मद्यापानाचा आस्वाद घेत आहेत. सध्या याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
And Trump thinks he can scare us with sanctions 😂😂#Mumbai #MumbaiRains pic.twitter.com/VChjmv8Qmd
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) August 20, 2025
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @pran_niwa या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहा. हा व्हिडिओ मुंबईतील
नालासोपारा येथील आहे. येथे मुलांनी रस्त्यावर साठलेल्या पाण्याला वॉरपार्क बनवून टाकले आहे. मुले आनंदाने मस्ती करताना दिसत आहेत.
किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये एका काका औरा फार्मिंग करताना दिसत आहे. सध्या यांचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ट्रीपल इंजिन सरकारची कमाल
मुंबईकरांची धमाल!
#मुंबई #पाऊस pic.twitter.com/hRANI8eyLA— Rashmi Puranik (@Marathi_Rash) August 20, 2025
अगदी स्पायडरमॅनही मुंबईकरांच्या मदतीसाठी धावून आला आहे.
सध्या हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांना याची मज्जा घेतली आहे. कोणी मजेशीर टिप्पणी देखील केली आहे. तुम्हाला मोफत स्विमिंग पूल मिळाला असे एका युजरने म्हटले आहे, तर दुसर्या एकाने भाऊ, ही मुंबई आहे असे म्हटले आहे.अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.