विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते... लग्नसमारंभातील Video Viral
भारतीय लग्न म्हटलं की परंपरा, रीतिरिवाज आणि अखंड सुरू राहणाऱ्या रस्मा यात तासन्तास जातात. अनेकदा यातून नवरा-नवरी तसेच नातेवाईकही थकून जातात. अशाच एका मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नवरी लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान थकून झोप घेताना दिसते. स्वतःच्याच लग्नात झोपणाऱ्या वधूचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच लक्षवेधी ठरला आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, लाल जोडे परिधान केलेली नवरी आपल्या लग्नाच्या मंडपात बसून गाठ झोपेत बुडून गेली आहे. व्हिडिओत ती थकव्यामुळे डुलक्या घेताना दिसते. तर शेजारी उभा असलेला वर पैशांच्या माळा घालून शांतपणे विधी पार पाडत असतो. हे दृश्य पाहून लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य उमटते.
लग्नाचा हा व्हिडिओ हजारोंनी पाहिला असून व्हिडिओ @ batteredsuitcase_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स नवरीच्या गोड हावभावांवर आणि तिच्या निरागसतेवर फिदा झाले आहेत. एका युजरने कमेंट केली, “आजचा सगळ्यात गोड व्हिडिओ हाच आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “नवरी फारच क्युट दिसतेय.” व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जेव्हा सकाळचे साडेसहा वाजतात आणि लग्नाच्या रस्मा अजूनही सुरूच असतात.”
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा भारतीय लग्नसोहळ्यांची मजा, त्यातील रंगतदार परंपरा आणि थकवणाऱ्या तरीही गमतीशीर घटना सगळ्यांसमोर आल्या आहेत. लोकांनी फक्त हसून आनंद घेतला नाही तर आपापल्या लग्नातील मजेदार अनुभवही शेअर केले आहेत. नवरीची डुलकी आणि वराचा साधेपणाने पार पडलेला सोहळा यामुळे हा व्हिडिओ खूपच लोकप्रिय ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.