viral video of delhi metro women's fighting over seat video goes viral
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळे पाहायला मिळते. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लोक अलीकडे कुठेही कधीही कोणत्याही शुल्लक अशा कारणांवरुन भांडायला सुरुवात करतात. यामध्ये कधी मेट्रोत, कधी बस, कधी भर रस्त्यात भांडणाचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच दिल्ली मेट्रोतील भांडणाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये विशेष करुन महिलांच्या भांडणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महिलांमध्ये जोरदार भांडणे सुरु आहे. यामध्ये दोन्ही महिला एकमेकींच्या वडिलांवरुन अपशब्द बोलत आहेत. एक महिला तुझ्या बापाची मेट्रो आहे का असे म्हणत आहे, तर त्यावर दुसरी मुलगी तु तुझ्या बापावर जा असे म्हणत आहे. यावर आणखी एक महिला बापाकडून हेच शिकून आलीय आहे का? असेही म्हणते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दोघींमध्ये सीटवरुन वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दोघेही एकमेकींशी असभ्य शब्दात भांडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two ladies inside Delhi Metro over seat issues
pic.twitter.com/8wgu6BWpMm— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी व्हिडिओ बघायला मज्जा आली असे म्हटले आहे. एका युजरने मेट्रो कमी बिग बॉस हाऊस जास्त वाटत आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने दिल्ली मेट्रोत तुमचे स्वागत आहे असे म्हटले आहे. आणखी एका युजरने हे तर रोजचे आहे, चित्रपटांपेक्षा दिल्ली मेट्रोचे व्हिडिओ पाहण्यात जास्त मज्जा येते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.