Viral video of Elon Musk and Donald Trump where trump is kissing musk feet video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात पाहून धक्का बसतो. अलीकडच्या काळात तर AI च्या तंत्रज्ञानाच्या मदतीने असे व्हिडओ बनवले जातता की, पाहून लोक हैराण होतील. यामुळे अनेकदा मोठा गोंधळ निर्माण होता. सध्या असाच एक AI च्या मदतीने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क आहेत. मात्र या व्हिडिओमुळे अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री सर्वांनाच ठाउक आहे. निवडणुकीच्या काळात मस्क यांची प्रचारादरम्यान ट्रम्प यांना मदत. नंतर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांच्या ट्रम्प प्रशासनात समावेश या गोष्टींमुळे ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या व्हिडिओमुळे मैत्रीत दरार पडण्याची शक्यता आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ अमेरिकेच्या मुख्य कार्यालयात अचानक पण टीवी स्क्रीनवर चालू झाला.व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डोनाल्ड ट्रम्प एलॉन मस्क यांच्या पायाजवळ असून त्यांचे पाय चाटताना दिसत आहेत आणि मस्क ऐटीत बसले आहेत. या व्हिडिओने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ मुख्य कार्यलयात जवळपास 5 मिनिटे लुपमध्ये सुरुच राहीला. कर्मचाऱ्यांनी बंद करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र व्हिडिओ काही केल्या बंद होत नव्हता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Trump kissing the feet of his boss Elon musk pic.twitter.com/SXiLPkrzx1
— DAILY DIARIES FRIDAY (@Squad_sussex96) February 17, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Squad_sussex96 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ट्रम्प त्यांच्या बॉसचे पायाला किस करत आहेत असे म्हटले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ अलीकडील अशाच एका सोशल मीडियावरील पोस्ट संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये राज्याच्या खुर्चीवर एलॉन बसलेले दाखवण्यात आले होते. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली होती. यामुळे या व्हिडिओवर देखील लोकांनी रियल किंग अमर रहे, किंग किंग है अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.