भारतात आलेल्या अमेरीकन महिलेचा व्हिडीओ व्हायरल
भारतातील आपली संस्कृती, परंपरा नेहमीच खूप वेगळी आणि खास राहिली आहे. अन्नापासून ते कपड्यांपर्यंत आपली शैली प्राचीन काळापासून वेगळी आहे. पण आपली भारतीय परंपरा हळूहळू परदेशी लोकांमध्येही लोकप्रिय होत आहे. भारतात येणारे परदेशी बऱ्याचदा सूट आणि सलवारमध्ये दिसतात. काही परदेशी महिलाह साडीतही दिसतात. अशाच एका अमेरिकन महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमेरिकेत राहणारी केट गुलाबी रंगाच्या साडीत रस्त्यावर फिरत आहे. मात्र व्हिडिओ बनवताना त्याच्यासोबत एक गायही दिसत आहे. अनेक ठिकाणी ती गाय केटसोबत फिरत आहे. ती स्वतःही गायीकडे पाहत आहे. यानंतर त्यांनी बाजारात जाऊन खरेदीही केली. केवळ पुरुष आणि मुलेच नाही तर महिलाही केटकडे वळून पाहत होत्या. केट रित्झी असे या महिलेचे नाव आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनने लोकांचे लक्ष वेधले आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना केटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी भारतीय लोकांमध्ये मिसळले. पण, मला अद्याप खात्री नाही की या व्हिडिओमध्ये लोक माझ्याकडे पाहत होते की माझ्यासोबत फिरत असलेल्या गायीकडे.’ केटचा हा व्हिडिओ 1 कोटी 34 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 5 लाख 16 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. एवढेच नाही तर या व्हिडिओवर 13 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हणले आहे की, “तुम्ही सुरक्षित आहात का?” आणखी एकाने तिचे “तुमचे भारतात स्वागत आहे” अशी कमेंट केली आहे.
निगेटिव्ह कमेंट्स
दुसऱ्या एका युजरने “तू खूप गोड आहेस दीदी, पण भारत सुरक्षित नाही.” तर तिसऱ्याने “एक लहान भाऊ म्हणून सल्ला देतो.” अजून एकाने “कोणाला मुद्दाम भारतात का फिरायचे आहे?” अशी निगेटिव्ह कमेंट केली आहे. या नकारात्मक कमेंट्सला उत्तर देत एकाने म्हणले आहे की, “कमेंट वाचून मला वाईट वाटते.प्रत्येकजण भारताची बदनामी करत आहे. तसे तर महिला कोणत्याही देशात सुरक्षित नाहीत, पण त्यामुळे तुम्ही भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. आपली भारतीय संस्कृती इतर कोणत्याही देशापेक्षा चांगली आहे. प्रत्येक देशात चांगले आणि वाईट लोक असतात. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारे भारताची बदनामी करणे योग्य नाही. एकमेकांचा आदर करा. आपल्या देशात येणाऱ्या पाहुण्यांना देवाचे स्थान असते. चुकीची मानसिकता असलेल्या लोकांपासून दूर राहा.”