Viral Video: इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली अन् चालक..; पुढे जे घडले पाहून बसेल धक्का
अलीकडे कधी कोणावर वाईट वेळ येईल सांगता येत नाही. अलीकडे अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गाडी चालवतान अचानक अपघात घडल्याने अनाकंना आपला जीव गमवावा लागला आहे. अशावेळी सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे असते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही अलीकडे स्कूटरला अचानक आग लागल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील.
असे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका स्कूटचर चालकासोबत अपघात घडला आहे. याचा व्हिडिओ तुपान व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. स्कूटरला अचानक लागली पण तरुणाच्या सावधगिरीने त्याचे प्राण वाचले आहे. नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
नेमके काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण स्कूटरवरुन चालला आहे. तो जात असतानाच एचानक इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर येण्यास सुरूवात होते. त्याच वेळी तरुणा गाडी थांबवतो. आणि इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी क्षमाचा विलंबही न करता काढून टाकतो. डिक्कीतून बॅटरी काढून टाकताच बॅचरी रस्त्यावर फेकून देतो. बॅचरी फेकून दिल्यावर अचानक पेट घेते. त्यातून भरपूर धू येऊ लागतो. रस्त्यावर आग लागलेली दिसताच आजूबाजूला लोक जमतात. त्याच वेळी तो तरुण त्याची गाडी बाजूल घेऊ जातो. तरुणाने जर बॅटरी लवकर काढली नसती तर स्कूटने अचानक पेट घेतला अता आणि त्याला जीव गमवावा लागला असता. पण त्याच्या सावधगिरीमुळे त्याचे प्राण वाचले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये स्कूटरच्या बॅटरीबद्दल सांगण्यात आले आहे. यावर काहींनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. अनेकांनी तरुणाच्या सावधगिरीचे कौतुक केले आहे. तर काहींनी अलीकडे या घटना वाढल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, वेळेवर निर्णय घेणे कूप महत्वाचे आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, EV स्कूटर सध्या खूप खराब लागत आहे. नवीन प्रोबलेम आहे हा. आणखी एका युजरने रिमुव्हेबल बॅटरी होती म्हणून जीव वाचले असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.