viral video Stray dogs fatally attack on woman incident goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशी, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा अंगाचा थरकाप उडवणारे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एका महिलेवर अचानक चार पाच कुत्र्यांनी हल्ला केला आहे. ही घटना हरिव्दारच्या ज्वालापूर शहरात घडली आहे. भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर अचानक हल्ला केला यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला घराबाहेर बसलेली आहे. याच वेळी काही भटकी कुत्री तिथे येतात. ते अचानक महिलेवर भूंक लागतात. त्यानंतर ती महिला तिथून बाजूला जाण्याचा प्रयत्न करते, मात्र कुत्री तिच्यावर हल्ला करतात आणि तिला खाली पाडतात. ती त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करते पंरतु कुत्री तिच्यावर सत हल्ला करतात. एक कुत्रा तिला फरपटत ओढून नेण्याचा प्रयत्न करतो, तिच्या पायाला चावा घेतो. याचवेळी घरातील सदस्य बाहेर येतात, परंतु तोपर्यंत कुत्री पळून गेलेली असतात. शएवटी व्हिडिओ महिला वेदनेने कळवळताना दिसत आहे. सध्या त्यानंतर काय घडले याबाबत कोणतीही माहिती उपल्बध नाही. मात्र हा व्हिडओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
हरिद्वार के शहर ज्वालापुर में आवारा कुत्तो ने एक महिला पर जानलेवा हमला कर दिया ओर महिला घायल हो गई। pic.twitter.com/kVvc6sy0F2
— bhUpi Panwar (@askbhupi) March 24, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @askbhupi एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका युजरने म्हटले आहे की, पाहून अंगावर काटा आला, तर दुसऱ्या एका युजरने गंभीर आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने महिलेची चौकशी करत तिच्यावर उपचार करण्यात आले का असा प्रश्न केला आहे. अनेकांनी अशा वेळी आजूबाजूला कोण नसल्यावर काय करायचे ते समजत नाही असे म्हटले आहे. तर काहींनी महिलेने त्यांना डिवचले असेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.