सध्या सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेकदा आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ आपण पाहतो. कधी रिल्स, कधी जुगाड, स्टंट तर कधी भांडणांचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत असतात. तसेच अनेकदा चोरांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडिओ एका चोराशी संबंधित आहे. यामध्ये पोलीस त्याच्या मागावर असून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण या चोराने पोलिंसांपासून वाचण्यासाठी स्वत:ला सुपरहिरो समजत असे काही केले आहे की पाहून हैराण व्हाल मात्र पोलिसही कमी नाहीत. त्यांनी दाखवून दिले आहे की, ते खरे सुपहिरो आहेत. त्यामुळे एकदा पाहूनच घ्या तुम्ही देखील त्या पोलिसवाल्याचे कौतुक कराल.
चित्रपटातील ॲक्शन सीनसारखे दृश्य
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या चोराने स्वतःला पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर हा सुपरहिरो असल्याप्रमाणे विजेची तार धरून लटकलेला दिसत आहे. हे दृश्य चित्रपटातील ॲक्शन सीनपेक्षा कमी नाही. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, चोर पोलिसांपासून वाचण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. तो विजेच्या खांबावर चढून थेट तारेला लटकला आहे, तर पोलीस त्याला खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. हे दृश्य पाहून सोशल मीडियावर हशा पिकला आहे. मात्र हा व्हिडिओ अद्याप कुठला आहे हे कळालेले नाही.
हे देखील वाचा- Viral Video: मुलाने माकडाचा हात पकडला अन् गरागरा…; पाहून तुमचेही डोके चक्रावेल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @parm_raju_pr या अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओवर कमेंट्सचा पूर आला आहे. काही त्याला सुपरमॅन म्हणत आहेत, तर काही त्याला टारझन म्हणत आहेत.एका यूजरने म्हटले आहे की, हा स्पायडर मॅनचा नवीन अवतार आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याचे पुढचे काम म्हणजे बॅटमॅन विथ वायर बनणे.’ या संपूर्ण घटनेत पोलिसांची मेहनतही अप्रतिम आहे. ते फक्त पकडण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर फेरफार करून तारही हलवत आहेत. पोलिसांचे अनेकांनी कौतुक केले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.