Viral Video: जंगलात पंख पसरून नाचत होत मोर इतक्यात वाघ आला अन्...; पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा इतके विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून किव येते. तर अनेकदा असे हास्यास्पद व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊ जाते. कधी स्टंट, कधीबांडण, जुगाड, कोणी डान्स असे अनेक रील्स बनवत असतात. तसेच वन्यजीवांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांच्या शिकार करतानाचे, तर कधी त्यांचे प्रेमळ व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळता आहे.या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्ही अनेकदा वाघाला शिकार करताना पाहिले असेल. तो त्याची शिकार अगदी शांत राहून करतो. पण अनेकदा त्याची शिकार फसते. असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. जेव्हा वाघ एका मोराची शिकार करायला गेला आणि असे काही झाले की, तुम्ही देखील थक्क व्हाल. हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहा.
पाहा काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगालात मोर पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूस काही लांडोर देखील आहोत. तिथेच एक वाघ देखील आहे. तो त्या मोराची शिकार करण्यासाठी अगदी हळू येते असतो. तो मोरावर अचानक हल्ला करतो. पण मोराला आणि लांडोरांना त्याची चाहूल लागताच ते तिथून पळून जातात. तसेच मोर देखील उडून जाऊ एका झाडावर चढून बसतो. वाघ देखील त्या झाडाखाली फिरत असतो. खरेतर या व्हिडिओमध्ये मोर आणि वाघाच्या जीवनाबद्दल सांगितले जात आहे. वन्यजीवांची जीवनशैली बद्दल .यामध्ये दाखवण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @rawrszn या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मोर कमी अंतरापर्यंत उड्डाण करू शकतात, अनेकदा 15 मीटर (49 फूट) उंचीपर्यंत पोहोचतात, जे त्यांना झाडावर उडून भक्षकांपासून पळून जाण्यास मदत करतात. शिकार केल्यानंतर, वाघिणी तिच्या चार शावकांकडे परत येते असे यामध्ये सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि लाइक केले आहे.