फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही.अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी भांडणाचे, कधी स्टंटचे, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसून हसून पोट दुखून आले आहे.
अलीकडे प्रत्येकजण सोशल मीडियावर काही ना काही रील बनवत असतो. अनेकांना तर याचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. तुम्हाला प्रत्येक दुसरा व्यक्ती सापडेल जो रील बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो. असे नाही की रील बनवणे चुकीचे आहे, परंतु काही लोक त्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक असे रील बनवतात की त्याचा अर्थ समजू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत, काही लोक विचित्र रील बनवतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील तितकाच विचित्र आहे.
व्हिडिओत नेमकं काय?
एका तरूणीने असे काही रील बनवली आहे की, सगळेच हसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या फोनचा कॅमेरा ऑन करून एका ठिकाणी सेट करत असल्याचे दिसत आहे. यानंतर ती रील बनवू लागते. ‘तू रूठा तो रूथ के इतनी दूर चली जाउंगी’ या गाण्याच्या बोलांवर ही मुलगी रील बनवते. व्हिडिओ सुरू केल्यानंतर, मुलगी मागे वळते आणि चालायला लागते आणि नंतर खरोखर अचानक ती जोरात पळत लांब निघून जाते. मुलगी इतकी दूर जाते की ती व्हिडिओमध्ये दिसत नाही. ही व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 08_jilan_khilchi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 1 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, दीदी, परत येऊ नका. दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, अरे आई, ती कुठे थांबेल? तर आणखी एका यूजरने दीदीचा फोन काढून घ्या, चौथ्याने लोक असे कसे जगतात. असा प्रश्न विचारला आहे. तर दिदीने गाण्याला खूपच सिरीयस घेतले. वा दिदी वा असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.