दैव बलवत्तर! तरुण रेल्वे पटरीवरुन बाईक घेऊन जाताना पडला अन् इतक्यात...; VIDEO पाहून उडेल थरकाप
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी रिल्स, तर कधी जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. रेल्वेसंबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी रेल्वतील भांडणाचे व्हिडिओ, कधी रेल्वेमध्ये डान्सचे व्हिडिओ, स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
याशिवाय, रेल्वे अपघातांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा लोक धावत्या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवतात. याशिवाय स्टंट करताना देखील लोक जीव धोक्यात घालतात. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियैावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण जेव्हा रेल्वे पटरीवरुन क्रॉस करायला जातो तेव्हा असे काही घडते की पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काही लोक एक गेटसमोर उभे आहेत. तिथे रल्वे फाटक असून ते बंद आहे आणि लोक ट्रेन जाण्याची वाट बघत आहे. दरम्यान पायी जाणारे काही रेल्वे फाटकाखालून मार्ग काढतात आणि रुळ ओलांडतात. त्याच वेळी एक बाईस्वार देखील रुळ ओलांडीू लागतो. पण तेवढ्यात एक ट्रेन भरधाव वेगाने येते. बाईकस्वार मागे सरकण्यास जातो आणि बाऊकवरुन खाली पडतो. तो पटकन उठतो पण त्याला बाईक तिथेच सोडावी लागते. त्याचे वेळी ट्रेन जोरात त्या बाईकला धडक देत निघून जाते. त्या जागी जर तो व्यक्ती असता तर त्याचा जीव गेला असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर millionaires_tools या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत अनेकांनी पाहिले आहे. अनेकांचा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मृत्यूला स्पर्श करून परत तर, दुसऱ्या युजरने यालाच नशीब म्हणतात असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने लिहिले- काळ आला होता पण वेळ नाही असे म्हटले आहे तर, चौथ्या एकाने त्याचे यमराजसोबत रोजचे उठण-बसणे आहे असे म्हटले आहे. पण या व्हिडिओवरुन लक्षात येते की, लोकांना रस्त्या क्रॉस करताना, रेल्वे रुळावरुन जाताना, रेल्वेमध्ये चढताना काळजी घेऊन चढावे. तरी लोक हे ऐकत नाही. नेहमी मृत्युला आवाहन देत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.