फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहिला मिळतात की हसू आवरणे कठीण होते. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट तसेच भांडणांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ असा व्हायरल होत आहे जो पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता जेव्हा तुम्ही गाडीचा टायरची हवा जाते, किंवा टायर पंक्चर होतो त्यावेळी काय करता? तर गाडी एखाद्या मेकॅनिककडे नीट करायला घेऊन जाता किंवा तुम्ही स्वत: टायर बदलता. पण या पठ्ठ्याने वेगळेच काही केले आहे. चालू गाडीतच रिक्षाचा टायर बदलला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण रिक्षात बसलेले आहेत. एकजण पुढे बसून रिक्षा चालवत आहे. तर दोघे मागे बसलेल आहेत. रिक्षा चालवणाऱ्याने रिक्षा तिरकी केली असून मागे बसलेला एक व्यक्ती रिक्षाचा टायर काढतो. त्यापैकी एक टायर उघडतो आणि मग दुसरा टायर त्यात बसवतो. या कामात तिसरा मुलगा मदत करतो. हा रिक्षा स्टंट पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी याला धोकादायक म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ripon_rider_07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटसले आहे की, चालत्या वाहनाचा टायर फुटल्याचे ऐकले होते, आज हे पहिल्यांचा पाहिले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भारतात काहीही होऊ शकते. आणखी एका युजरने म्हटले आहे कीस, आता कोणीतरी कॉपी करा. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.