'हाय रे हाय तेरा ठुमका' गाण्यावर काकांनी खेळला जबरदस्त गरबा; पाहून नेटकरी म्हणाले...
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याटा धक्का बसतो. तर अनेकदा हसूहसून लोटपोट होण्यासारखे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. खरंतर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस मात्र अजूनही गरबा, दांडिया खेळतानाच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नवरात्रीचा आनंद घेताना दिसत आहेत.
कुठे आजी-आजोबांची जुगलबंदी पाहायला मिळता आहे, तर कुठे वेगवेळ्या पोशाखात पंजाबी स्टाईलमध्ये गरबा करत आहेत, तर कुठे दारू पिऊन गरबा करणारे लोक दिसत आहे. सध्या असाच एक भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका काकांनी असा भन्नाट गरबा केला आहे की, व्हिडिओ पाहून नेटकरी हसूनहसून लोट पोट झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हाय रे हाय तेरा ठुमका
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लॉनमध्ये गरबा खेळण्यासाठी लोक जमलेले आहेत. अनेकजण छोटा छोटा ग्रुप करून खेळताना दिसत आहेत. कोणी दांडिया खेळत आहे. तर कोणी गरबा. गरबा खेळण्यचा उत्साह प्रत्येकामध्ये दिसत आहे. अनेकजण गरबा खेळण्यात मग्न झाले आहेत. पण तुम्हाला दिसेल की, या व्हिडिओमध्ये एक काका नाचताना दिसत आहेत. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हाय रे हाय तेरा ठुमका गाण्यावर अगदी जोशात डान्स करताना दिसत आहेत. काकांची एनर्जी पाहून अनेजण कौतुक करत आहेत.
हे देखील वाचा – Viral Video: वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _kokani_suhas121 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘दिवस पाचवा नाही, पेग पाचवा आहे’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘देशी पॉवर’ची कमाल, आणकी एकाने म्हटले आहे की, आता एकपण बीट मिस नाही होणार, डोन्ट अंडरएस्टिमेट काकांचा ठुमका’ तर चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, काका जबरदस्त.. अशा प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.