viral video uncle used amazing Idea for opeing shop desi jugad video viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक भन्नाटा देशी जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसे जुगाड करणाऱ्यांच्या मते यामुळे त्यांचा पैसा वाचतो तसेच वेळही वाचते. काही जुगाड असे असतात की याचे कौतुक केल्याशिवाय आपण राहत नाही, तर काही असे जुगाड पाहायला मिळतात की पाहू हसावे का रडावे कळत नाही. सध्या एक भन्नाटा जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये काकांनी आपला नवीन दुकान उभारण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही वाचवले आहे. या काकांनी कारवरच शॉप ओपन केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काकांना चारचाकीच्या वरच्या बाजूला दुकान बांधले आहे. यामध्ये सनरुप ओपने करुन काका दुकानाचे मालक उभे आहेत. तुम्ही पाहू शकता की, दुकानात सामान लावण्यात आले आहे. तर उर्वरित सामान चारचाकीमध्ये ठेवण्यात आली आहे. यामध्ये कुरुकरे, पान, नाश्ता यांसारख्या खाण्याच्या वस्तू आहेत. काकांना घरी जाताना फक्त कार घरी घेऊन जायची आहे. त्यासोबत त्यांचे दुकानही येणार आहे. त्यांना दुकानामध्ये चोरी होण्याची देखील कसले टेन्शन नाही.
अमेरिका भी कह रहा है कहां से लाते हैं, इतना दिमाग भारत के लोग 😂🤣🔥 pic.twitter.com/mdJU1i2vWI
— Toofan Ojha (@RealTofanOjha) August 21, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RealTofanOjha या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका युजरने आपल्या भारतात जुगाड करणाऱ्यांची कमी नाही असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने काकांना अवॉर्ड दिला पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने काकांनी भागी डोकं लावलं असे म्हटले आहे. तर आणखी एकाने भारताचे नागरिक कोणापेक्षा कमी नाहीत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळालेले नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.