Viral Video: आता तर हद्दच झाली! महिलेने असं काही चोरी केलं की; व्हिडिओ पाहून कपाळाला हात लावाल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अनेकदा अस व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा अस व्हिडिओ पाहायला मिळतात की, हसून पोट दुखून येते. जुगाड, स्टंट, भांडण आणि डान्स रिल्स असे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याशिवाय तुम्ही अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. कधी अपघाताचे, तर कधी चोरीच्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून कपाळाला हात लावला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण लोक दागिने, पैसे याशिवाय इतर अनेक गोष्टीदेखील चोकी केल्या आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. आता या महिलेलाच पाहा ना या महिलेने चक्क बेल्डिंगच्या बाहेरील बाक चोरी केला आहे.
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बेल्डिंगच्या बाहेर महिला बाकाला धरून बसलेली आहे. असे वाटते की कदाचित तिला काही लागले असेल म्हणून ती खाली बसली असे. पण ती इकडे तिकडे बघत असते आणि अचानक काही सेकंदात बाक उचलते. त्यानंतर बाक डोक्यावर घेते आणि तिथून निघून जाते. ही संपूर्ण घटना बेल्डिंगच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. ही फूटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा- नाद खुळा! चंद्रा गाण्यावर काका-काकूंनी धरला ठुमका; व्हिडिओ तुफान व्हायरल…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफर्म इन्स्टाग्रामवर sutta_gram या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला पाहिले असून यावर मजेसीर प्रतक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हे पण सोडले नाही, हद्दच झाली राव, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, भाऊ केवढी ताकद आहे तिच्यात. आणखी एकाने म्हटले आहे की, महिला काय करतील सांगता येत नाही. चौथ्या एकाने म्हटले आहे की, घरी सोफा नसेल बहुतेक. अशा प्रतिक्रीया लोकांनी व्हिडिओवर दिल्या आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आता तर खुर्चीपण चोरी जायला लागली.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.