फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर अनेकदा आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ दिसतात. तसेच सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वृद्ध नागरिक देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुम्ही पाहिलेच असेल की, अनेकदा हे वयोवृद्ध लोक डान्स करताना दिसतात. काहीजणा लाजतात. पण काहीजण मनमुरादपणे नाचण्याचा आनंद लुटतात. काही दिवसांपूर्वीच एका आजीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत होता. कधी कधी प्रत्येक क्षण आनंदात कसा जगायचा हे ते आपल्याला शिकवून जातात. व्हायर ल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. एका कार्यक्रमादरम्यान काका-काकूंनी चंद्रा गाण्यावर जोरादार ठुमका धरला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मैदानावर कार्यक्रम सुरू आहे. अनेक लोक कार्यक्रमासाठी जमलेले आहेत. दरम्यान एक काका-काकू प्रेक्षकांच्या मधोमध डान्स करताना दिसत आहेत. दोघांनी चंद्रा गाण्यावर ठुमका धरला आहे. काका तर भारी एक्सप्रेशन देत डान्स करत आहेत. काकूपण काकांना साथ देत भन्नाट डान्स करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. अनेक तरूमांचा जमाव देखील कार्यक्रमात जमलेला आहे. सगळेजण काका-काकूंचा व्हिडिओ बनवत आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर indianfestivalandevents या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तपार्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, कामत काकांचा नादच खुळा, तर दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, काका जोमात, भारीच. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काकूंचा पण नाद नाही करायचा. अशा भन्नाट प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, नाद खुळा. असा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.
हे देखील वाचा- तुफान राडा! एसटी बसमध्ये महिला भिडल्या; झिंझ्या उपटत जोरदार हाणामारी,VIDEO व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.