बाप रे! कामगारांचा भल्या मोठ्या टॉवरवर रिल बनवण्याचा स्टंट; VIDEO पाहून लोक हैराण
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अलीकडे लोकांनी रिल बनवण्याचे इतके वेड लागले आहे. फेमस होण्यासाठी लोक जीवाची पर्वा देखील करत नाहीत. अनेकदा लोक इतके धोकादायक स्टंट करतात की पाहून आपलाच थरकाप उडेल. स्टंट करणाऱ्याचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे स्टंट करणाऱ्या स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओ काही कामगारांनी रिल बनवली आहे, पण ती अशा ठिकाणी की यामुळे त्यांच्या जीव जाण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. अनेकांनी व्हिडिओवर संतापजनक अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अशा व्हिडिओंमुळे समाजात चुकीचा संदेश पसरत आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून हैराण व्हाल.
व्हिडिओत नेमके काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, एका उंट ठिकाणावरील टॉवर दिसत आहे. हा टॉवर एवढ्या उंचावर आहे की, कोणी खाली पडले तर त्याच्या हाडांचा चुरा होऊन जाईल. या ठिकाणी काही कामगार काम करत आहे. त्याच वेळी ते रिल बनवतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकजण व्हिडिओबनवत आहे तर दुसरे बाकीचे त्यावर डान्स करत आहे. हे ठिकाण अतिशय उंचावर आहे मात्र या कामगारांना कशाचीच भिती वाटत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी कामगारांना असे न करण्याच सल्ला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दिला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका युजरने म्हटले आहे की, काळजी घ्या भाऊ.., तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे खूप खतरनाक आहे.तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या कुटूंबाची जबाबदारी पाहणार आहात. तर एका युजरने म्हटले आहे की, अशा व्हिडिओ इन्स्टाग्राम व्हायरल पण कसे करते, लोकांना पण कळत नाही अशा गोष्टी लाईक केल्यावर जास्त व्हायरल होतात ते असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.